एक्स्प्लोर
PUBG गेमच्या नादात अन्न पाणी सोडलं, 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
PUBG गेम लोकांच्या खासकरुन मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु लागलाय. आंध्रप्रदेशात या गेमच्या नादात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

हैदराबाद : PUBG गेम लोकांच्या खासकरुन मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु लागलाय. यवतमाळमध्ये पब्जी गेममुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तसेच पंजाबमध्ये या गेमच्या नादात आईवडिलांचे 16 लाख रुपये उडवल्याची घटना घडल्यानंतर आता एका 16 वर्षाच्या मुलाचा देखील या गेममुळं मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशमधील या मुलाने पब्जीच्या नादात अन्न पाणी सोडलं आणि यातून वाढलेल्या आजाराने त्या मुलाचा बळी गेला. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार हा मुलगा लॉकडाऊनमुळे मागील अनेक महिन्यांपासून घरीच होता. या काळात त्याला या गेमचे व्यसन लागले. तो पब्जी गेम खेळू लागल्यानंतर तर त्याने गेमसाठी अन्न पाण्याचाही त्याग केला. गेम खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवायचाही नाही. अशाने या मुलाची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला इलूरूमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण सतत कमी होत गेल्याने त्याची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. याआधी पुण्यात देखील अशी घटना घडली होती. हर्शल मेमाने नावाच्या युवकाचा गेम खेळताना ब्रेन स्ट्रोक आला होता. भिवंडीत पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली होती. तर भिवंडीतील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने पबजीच्या नादापायी घर सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला होता. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केल्याचीही घटना घडली होती. संबंधित बातम्या
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण






















