एक्स्प्लोर

Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

Eknath Shinde मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं. मात्र, यातलं मोठं यश फक्त भाजपलाच मिळालं असून शिवसेनेनं केवळ 29 जागा जिंकल्या

मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई (Mumbai) महापालिकेचा निकाल लागला अन् गुवाहाटीत गाजलेल्या काय झाडी काय डोंगर या शहाजीबापूंच्या फेमस डॉयलॉगची आठवण झाला. शहाजीबापूंची आज अचानक आठवण येण्याचं कारण म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उचलेलं पाऊल. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंना मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय का? एकनाथ शिंदेंना नेमका कुणावर भरवसा नाही? मुंबईत ठाकरेंना महापौर बसवणं शक्य होईल? यासह अनेक प्रश्नांना जन्म घातलाय तो एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्स निर्णयाने. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं. मात्र, यातलं मोठं यश फक्त भाजपलाच मिळालं असून शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 29 जागा जिंकता आल्या. मात्र, तरीही मुंबईत निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना  वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय, भाजपप्रणित महायुतीला 114 ची मॅजिक फिगर गाठणं शक्य नाही. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात, अशी भीती एकनाथ शिंदेंना सतावत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याच भीतीपोटी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवल्याचं बोललं जातंय.

एकनाथ शिंदेंचं टेन्शन का वाढलं असावं? या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी केलेलं अॅनालिसीसही विचार करण्यासारखंच म्हणावं लागेल. फोडून आलेली माणसं टिकवण्याचं टेन्शन, कदाचित त्यांना भाजपची भीती वाटतेय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी यॉर्करचा मारलाय. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे उत्तर देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच, मात्र तूर्तास देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे कॅप्टन म्हणून लगेच उत्तर दिलंय. कुठलीही पळवापळवी होणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. 

महापौर बसवण्याची ठाकरेंची इच्छा कायम

मॅजिक फिगर गाठली नसली तरी मुंबईत महापौर बसवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा कायम आहे, आणि ही इच्छा त्यांनी दिवसभरात दोनदा बोलून दाखवली. मुंबईत महायुतीचा महापौर बसणारय हे तर निकालांवर स्पष्ट झालंय. तो महापौर मराठीच असेल असं खुद्द फडणवीसांनी वारंवार सांगितलंय. पण, गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईचा महापौर शिवसेनेचा नसणार आहे. त्यावरूनच ठाकरेंचे शिलेदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल आतापर्यंत न बोलून दाखवलेली सल पहिल्यांदा बोलून दाखवलीय. फुटीरवादी राजा थेट जयचंद असा नामोल्लेख संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा केलाय. 

शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स कशासाठी?

भाजपनं मुंबई काबिज करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण केलंय पण शिंदेंच्या मदतीनंच भाजपचा पहिला महापौर मुंबईत विराजमान होणार आहे. त्यामुळेच ठाकरेंपेक्षा कमी असले तरी शिंदेंचे 29 नगरसेवक गेमचेंजर ठरणार आहेत. म्हणूनच की काय गुवाहाटीचा अनुभव असलेल्या शिंदेंना आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पाठवावं लागतंय. याशिवाय, शिंदेंकडून दवाबाचं राजकारण केलं जातंय का, महापौर किंवा स्थायी समिती सभापतीपदासाठी तर हे हॉटेल पॉलिटिक्स नाही ना, असाही प्रश्न राजकीय जाणकरांना पडलाय.

हेही वाचा

मुंबईचा मराठी माणूस भाजपसोबत, मराठी माणसाला जहागिर समजणाऱ्यांच्या लक्षात आलं असेल, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI VS JOB : AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? कोण सुरक्षित?
Yawatmal : उर्दू शाळेत गायलं पाकिस्तानी गीत,विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गीतावर नृत्य केल्याचा आरोप
Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
Embed widget