एक्स्प्लोर

PUBG खेळू न दिल्याने मुलाने घर सोडले

तरुणांमध्ये पबजी (PUBG) या ऑनलाईन गेमचे वेड वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून या गेमचे दुष्परिणाम समोर येत आहेत.

भिवंडी : तरुणांमध्ये पबजी (PUBG) या ऑनलाईन गेमचे वेड वाढतच चालले आहे. राज्यासह देशात पबजी गेमच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग गुरफटलेले असताना, मागील महिन्यात पबजी गेममुळे दोघा युवकांना रेल्वेने उडविल्याची घटना घडली होती. त्यातच आता भिवंडी शहरातील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने  पबजीच्या नादापायी घर सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला आहे. भिवंडी शहरातील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मयुर राजेंद्र गुळुंजकरला मोबाईल वर पबजी गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. रात्ररात्र भर तो गेम खेळात असल्याने बऱ्याच वेळा त्याची आई त्याच्यावर रागावत असे. असाच नेहमीप्रमाणे तो मोबाईलवर पबजी गेम खेळत बसला असता आईने रागावून तुझी तक्रार मामासा करते असे धमकावले. नंतर त्याला आईने बहिणीला आणायला भिवंडी रेल्वेस्टेशनला पाठवीले. घरातून दुचाकी घेऊन गेलेल्या मयुरने रेल्वे स्टेशन परिसरात येताच दुचाकीची चावी आणि मोबाईल दुचाकीच्या हॅण्डल समोरील जागेत ठेवून निघून गेला. VIDEO | 'पबजी' जीवावर बेततोय! | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा नेहमीप्रमाणे भिवंडी रेल्वेस्टेशन परिसरात नेहमीच्या ठिकाणी त्याची बहीण आली असता आपला भाऊ न दिसल्याने तिने मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल दुचाकीवरच वाजत राहिल्यामुळे तिने घरी कुटुंबियांशी संपर्क करत या घटनेची माहिती दिली. घरातून रागावून गेलेल्या मयूरचे वय हे सज्ञान नसल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणी नारपोली पोलीस अधिक तपास करत असून पोलीस व कुटुंबीय ठिकठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. मयूरच्या निघून जाण्याने त्याचे कुटुंबीय सध्या चिंतेत असून मयुरची आई मेघा गुळुंजकर आणि मामा नितीन खोपडे यांनी मयुरला घरी परत येण्याचे आवाहन केले आहे. संबंधित बातम्या PUBG खेळण्यासाठी महागडा मोबाईल न मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या PUBG खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू

महत्त्वाच्या बातम्या

सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget