एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य

World Economic Forum 2026  : यंदाच्या दावोस दौऱ्यात प्रमुख उद्योगपतींचा समावेश असून 16 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करार करण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. 

Devendra Fadnavis Davos Visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum  WEF) वार्षिक परिषदेसाठी 5 दिवसीय दावोस (Davos) दौऱ्यावर रवाना होत असून ते रविवारी मध्यरात्री स्वित्झर्लंडकडे प्रस्थान करणार आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक (Investment in Maharashtra) आणण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे.

मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ दावोसला रवाना (Maharashtra Delegation Davos Visit)

मुख्यमंत्र्यांसोबत राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्रातील काही प्रमुख उद्योजकही दावोसला जाणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या वार्षिक बैठकीत विविध देशांतील राजकीय नेते, उद्योगजगतातील दिग्गज आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीवर विशेष लक्ष (Focus on Investment for Maharashtra)

मागील वर्षी राज्य सरकारकडून तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू (MoU) करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 72 टक्के एमओयू प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. यंदा मात्र राज्य सरकारचे लक्ष्य 16 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करार करण्याचे आहे. त्यामुळे यंदा दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात किती मोठी गुंतवणूक येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ट्रम्प यांचे दावोसमध्ये विशेष आकर्षण (Donald Trump At WEF Davos)

यंदाच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेचे प्रमुख आकर्षण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार आहेत. ट्रम्प यांच्याकडून दावोसला सर्वात मोठे शिष्टमंडळ दाखल होणार असल्याची माहिती आहे.

भारताचा जागतिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न (India’s Global Strategy and Influence)

दरम्यान, भारतातील जवळपास 10 राज्यांचे मुख्यमंत्री यंदा दावोस दौऱ्यावर असणार आहेत. सध्याच्या भू-आर्थिक तणावांच्या (Geo-economic tensions) पार्श्वभूमीवर गुंतवणूक, जागतिक धोरणे आणि आंतरराष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत भारताचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच व्यापार (Trade), तंत्रज्ञान (Technology), ऊर्जा (Energy) आणि पुरवठा साखळी (Supply Chain) क्षेत्रात भारताची भूमिका अधिक बळकट करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget