एक्स्प्लोर
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
EPFO : ईपीएफओकडून येत्या एप्रिलपासून खातेधारांना पीएफचे पैसे काढण्यासाठी यूपीआयचा पर्याय उपलब्ध निर्माण होणार आहे.
ईपीएफओ
1/5

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना येत्या एप्रिलपासून खातेधारकांना पीएफचे पैसे यूपीआयमधून काढण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. यूपीआयच्या माध्यमातून पीएफचे पैसे थेट बँकेत जमा होतील.अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार पीएफ खात्यात ठराविक रक्कम शिल्लक ठेवून उर्वरित रक्कम यूपीआयच्या माध्यमातून काढता येईल. जी खातेदाराच्या बँक खात्यात जमा होईल.
2/5

ईपीएफओ खातेदारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातून यूपीआयच्या पिनचा वापर करुन सुरक्षित व्यवहार करता येईल. पैसे बँक खात्यात आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट, एटीएम किंवा डेबिट कार्डद्वारे त्या पैशांचा वापर करता येईल. सूत्रांच्या माहितीनुसार ईपीएफओ या प्रणालीच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
Published at : 17 Jan 2026 09:23 PM (IST)
Tags :
EPFO आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण






















