एक्स्प्लोर

पब्जी गेमवरुन वाद, पुण्यातील तरुणावर कोयत्याचे वार, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

पब्जी या मोबाईल गेमच्या आहारी गेल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना अजून ताजी आहे. त्यातच आता शहरात पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही, म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे : पब्जी या मोबाईल गेमच्या आहारी गेल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना अजून ताजी आहे. त्यातच आता शहरात पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही, म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी हडपसर येथील लोखंडी पुलाजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुनील माने (19) असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो हडपसरमधील शिंगोट प्लाझ येथील रहिवासी आहे. याप्रकरणी हेमंतसिंह रजपुत (वय 24, रा. महम्मदवाडी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी सनी पांडुरंग लोंढे (18), करण वानखेडे (22)या दोघांना अटक केली आहे. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील रविवारी सायंकाळी सहा वाजता फिर्यादी व आरोपी लोखंडीपुलाजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी सनी लोंढे याने पब्जी गेम खेळण्यासाठी फिर्यादी रजपुत याच्याकडील मोबाईल मागितला. त्यावेळी फिर्यादीचा मित्र सुनील माने याने सनी लोंढे यास मोबाईल देत नाही, असे सांगितले. त्यामुळे सनी व सुनील या दोघांमध्ये बाचाबाची होऊन भांडण सुरू झाले. भांडण सुरु झाल्यावर सनीचा मित्र करण वानखेडे याने सुनील माने यास आता सोडायचे नाही, त्यास जीवे मारायचे, असे म्हणत त्याच्याजवळील कोयता काढून सुनील माने याच्या डोक्‍यात घातला. लोंढे आणि वानखेडे यांनी त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माने गंभीर जखमी झाल्यामुळे आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर फिर्यादी व स्थानिक नागरीकांनी सुनीलला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले .

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget