पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर, 87 मंदिरात भाजप नेते घेणार दर्शन
PM Modi Kedarnath Dham Visit : पंतप्रधान मोदी केदरनाथ मंदिरात सकाळी 7.30 वाजता पूजा करणार आहे. पूजा झाल्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन करणार आहे.
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला उत्तराखंड येथे जाऊन केदरनाथचे दर्शन घेणार आहे. मोदी सकाळी सकाळी डेहराडूनवरून केदरनाथला रवाना होणार आहे. दरम्यान शेवटच्या मिनिटाला जर हवामानात बदल झाले तर कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी केदरनाथ मंदिरात सकाळी 7.30 वाजता पूजा करणार आहे. पूजा झाल्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन करणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदी श्री आदि शंकराचार्यांचे प्रतिमाचे अनावरण करणार आहे. 2013 च्या पूरानंतर आदि शंकराचार्यांच्या समाधीचे पुनर्निमाण केले गेले.
केदरनाथधाम यात्रेच्या क्षणाला ऐतिहासिक करण्यासाठी भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे असे मिळून एकूण 87 मंदिरात साधू, भक्तांना आणि नागरिकांना आमंत्रित केले होते.
प्रधानमंत्री मोदी मंदिरात पूजा , श्री आदि शंकरचार्यांच्या समाधी आणि प्रतिमेचे अनावरण झाल्यानंतर देशाला संबोधित करणार आहे. प्रधानमंत्री संबोधनाचे 87 एलईडी स्क्रीन आणि बिग स्क्रीनवर प्रसारित करण्यात येणार आहे. श्री आदि शंकराचार्य मंदिरात पोहचण्याचा मार्गावर 87 मंदिरात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.
- सोमनाथ ज्योतिर्लिंग - सीआर पाटील (प्रदेशाध्यक्ष)
- मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग - किशन रेड्डी
- महाकालेश्वर ज्योतिर्लिंग - शिवराज सिंह चव्हाण, धर्मेंद्र प्रधान, भोजपूर- बीडी शर्मा (प्रदेशाध्यक्ष)
- केदरनाथ ज्योतिर्लिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित असणार आहे.
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग
- विश्वनाथ ज्योतिर्लिंग- योगी आदित्यनाथ
- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
- वैद्यनाथ ज्योतिर्लिंग - रघुवर दास, दीपक प्रकाश (प्रदेशाध्यक्ष), निशिकांत दुबे
- नागेश्वल ज्योतिर्लिंग - भूपेंद्र पाटील (मुख्यमंत्री)
- रामेश्वर ज्योतिर्लिंग
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
- ओंकारेश्वर- कैलाश विजय वर्गीय
या 12 ज्योतिर्लिंगाशिवाय इतर महत्त्वाच्या धार्मिक स्थळावर भाजपचे नेते उपस्थित असणार आहे. भाजप या कार्यक्रमाद्वारे संदेश देणार आहे.