पंतप्रधान मोदी काश्मीर फाईल्सचे सर्वात मोठे प्रचारक, राजकीय अजेंडा राबवला जातोय : संजय राऊत
Sanjay Raut On The Kashmir files Movie :काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक आहेत, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
![पंतप्रधान मोदी काश्मीर फाईल्सचे सर्वात मोठे प्रचारक, राजकीय अजेंडा राबवला जातोय : संजय राऊत Prime Minister Narendra Modi is biggest propagandist of The Kashmir files Movie, political agenda is being implemented: Sanjay Raut पंतप्रधान मोदी काश्मीर फाईल्सचे सर्वात मोठे प्रचारक, राजकीय अजेंडा राबवला जातोय : संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/16/4f53af00973a05eb97195c15d94ade05_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Kashmir files Movie Updates : द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या सिनेमावरुन सध्या विविध मतप्रवाह सुरु आहेत. यावरुन राजकारण देखील रंगल्याचं चित्र आहे. यात आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी देखील उडी घेतली आहे. आज दिल्लीमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक आहेत. हा एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मीरी पंडितांची (Kashmiri Pandit) वेदना देशात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असं देखील राऊत म्हणाले.
राज्यपालांकडून ही अपेक्षा नाही...
राज्यपाल कोश्यारी यांच्यावर संजय राऊतांनी आज पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यपालांकडून ही अपेक्षा नाही. ते राजकारण करत आहेत, इतिहासात काळ्या अक्षरांनी यांची नोंद होईल, असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. या पक्षातून राज्यपाल आले त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहेत. ज्या पातळीवर त्यांच्या पक्षाने आणि राज्यपालांनी हा संघर्ष नेऊन ठेवला आहे इतिहासात त्याची काळ्या अक्षराने नोंद होईल. घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं हे आणिबाणीची आठवण करून देणारं आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी म्हटलं की, महाराष्ट्र पोलीस किती सक्षम हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिलं. त्यामुळे आताही पोलीस सक्षमपणे काम करतील, असं राऊत म्हणाले. पंतप्रधानांनी राज्यातल्या सगळ्याच खासदारांना बैठकीला बोलावलं असतं पण भारतीय जनता पक्षाने त्यांना फक्त एका पक्षाचे पंतप्रधान करून ठेवलं आहे. ते संसदेचे नेते आहेत हे विसरत चालले आहेत, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज शिवसेना खासदारांची बैठक
संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता सगळे शिवसेना खासदार एकत्रित बैठक करणार आहेत. खासदारांना विभाग निहाय राज्यातल्या जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर होणारी ही बैठक महत्वाची असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
The Kashmir Files : 'तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका'; कंगनाचा व्हिडीओ व्हायरलLIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)