The Kashmir Files : 'तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका'; कंगनाचा व्हिडीओ व्हायरल
द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपट पाहिल्यानंतर कंगनानं (Kangana Ranaut) एक व्हिडीओ शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे.
The Kashmir Files : सध्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कंगना रनौतनं (Kangana Ranaut) नुकताच हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर कंगनानं एक व्हिडीओ शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना व्हिडीओमध्ये म्हणते, 'माझ्या कुटुंबासोबत मी द कश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिला. विवेक अग्निहोत्री तुम्ही धन्य आहात. या चित्रपटाची निर्मीती केल्यामुळे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. गेली कित्येक वर्ष लोक जे पाप करत होते ते तुम्ही धुतले आहेत. मी तुमचे आभार मानते.' तसेच पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल, भारतातील लोकांबद्दल देखील कंगनानं वक्तव्य केलं आहे.
'तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका' असंही या व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली. 'या वर्षातील सर्वात महत्वाचा चित्रपट मिस करू नका.', असं कॅप्शन या व्हिडीओला कंगनानं दिलं.
पाहा कंगनाचा व्हिडीओ-
View this post on Instagram
'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
- Bollywood Films : मोंदीच्या काळात विरोधी पक्षांवर टीका करणारे 'हे' सिनेमे झाले प्रदर्शित
- Mishan Impossible : तापसी पन्नूच्या 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाचा ट्रेलर आऊट
- Top Gun Maverick : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा होणार प्रीमिअर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha