एक्स्प्लोर
हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर, अभिनंदन यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य
तुम्ही कायम प्रयोगशाळेत जीवन व्यतीत करणारे लोक आहात. एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्टवर काम करण्याची सवय असते. असाच एक ‘पायलट’ प्रोजेक्ट आम्हीही यशस्वी केला आहे. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केलं आहे.
नवी दिल्ली : “ही तर फक्त प्रॅक्टिस, रिअल काम नंतर”, असं सूचक वक्तव्य भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात मोदी बोलत असताना हे वक्तव्य केलं.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली. अभिनंदन यांच्या सुटकेची बातमी येताच मोदींनी अनोख्या पद्धतीने भाषणाची सुरुवात केली.
VIDEO | हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर : पंतप्रधान नरेंद्र मोदी | एबीपी माझा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य
तुम्ही कायम प्रयोगशाळेत जीवन व्यतीत करणारे लोक आहात. एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्टवर काम करण्याची सवय असते. असाच एक ‘पायलट’ प्रोजेक्ट आम्हीही यशस्वी केला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा गडगडाट झाला. शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराच्या कार्यक्रमात सर्व पुरस्कार विजेत्या संशोधकांचे मोदींनी अभिनंदन केलं.
VIDEO | भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा | एबीपी माझा
संबंधित बातम्या
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा
भारताला अस्थिर करण्याचा डाव उधळून लावा, सैन्याच्या पाठिशी उभे राहा, मोदींचं देशवासियांना आवाहन
जिनिव्हा करार : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला परत आणण्याचा मार्ग
पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नकापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती
भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, बडगाममधील चॉपर पाडलं नसल्याची कुबली
पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही
डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं
...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
कोल्हापूर
Advertisement