PM Modi Speech LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह : कोरोनाच्या दुसरे लाटेमुळे देशापुढे मोठे संकट : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8.45 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे.

Background
नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8.45 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी आज जनतेशी काय संवाद साधणार, देशातील कोरानाच्या गंभीर स्थितीबद्दल काही मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मजुरांनी जिथे आहे, तिथेच थांबावे; स्थलांतर करू नये :मोदी
श्रमिकांनाही तातडीने लस मिळेल अशी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मजुरांनी जिथे आहे, तिथेच थांबावे. स्थलांतर करू नये. अर्थचक्र आणि उद्योग विश्व सुरू राहील याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे : मोदी
आजपर्यंत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण : मोदी
आजपर्यंत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना योद्धा आणि बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
























