राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंबद्दल प्रशांत भूषण यांचे चुकीचे ट्विट, नंतर मागितली माफी
Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल वकील प्रशांत भूषण यांनी चुकीचे ट्विट केले होते. नंतर पहिले ट्विट डिलीट करून प्रशांत भूषण यांनी माफी मागितली आहे.

Presidential Election 2022 : वकील प्रशांत भूषण ( prashant bhushan ) हे अनेक वेळा त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. प्रशांत भूषण यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत देवीची प्रर्थना करत असल्याचे दिसत आहे. मात्र, फोटो मॉर्फेड असल्याचे समोर आल्यानंतर प्रशांत भूषण यांनी द्रौपदी मुर्मू यांची मागितली आहे.
प्रशांत भूषण यांनी द्रौपदी मुर्मू यांचा मॉर्फ केलेला फोटो ट्विट केला होता. "भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली. त्या फक्त रबर स्टॅम्प असतील, त्यामुळे त्या स्वतंत्रपणे काम करू शकणार नाहीत, यात काही शंका आहे का? असे ट्विट प्रशांत भूषण यांनी केले होते.
प्रशांत भूषण यांच्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. काही नेटकऱ्यांनी या फोटोशी छेडछाड केल्याचे म्हटले. त्यानंतर प्रशांत भूषण यांनी या फोटोबाबत माहिती घेतली असता त्यांना फोटो मॉर्फ केलेला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हे ट्विट डिलीट करत द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली.
"राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबतचा फोटो मॉर्फ करण्यात आल्याचे मला कळले आहे. अशा परिस्थितीत मी द्रौपदी मुर्मूची माफी मागतो आणि ट्विट केलेला फोटो डिलीट करतो, असे ट्वीट प्रशांत भूषण यांनी केले आहे.
It has been brought to my notice that this photo of Smt Murmu with Mr Bhagwat might be morphed. I therefore am deleting it with apologies to Mrs Murmu. https://t.co/QOn5pg5o5D
— Prashant Bhushan (@pbhushan1) July 5, 2022
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
