एक्स्प्लोर

Pravasi Bharatiya Divas 2021: भारतात का साजरा केला जातो 'प्रवासी भारतीय दिवस?' काय आहे या दिवसाचं महत्व?

परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे (Persons of Indian Origin ) देशाच्या विकासात असलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी 9 जानेवारीला 'प्रवासी भारतीय दिवस' (Pravasi Bharatiya Divas) साजरा केला जातो. आजच्याच दिवशी, 1915 साली महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आफ्रिकेतून भारतात परत आले होते. या दिनाचे औचित्य साधून 2003 साली पहिल्यांदा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला.

नवी दिल्ली: मूळचे भारतीय पण सध्या परदेशात राहत असलेल्या नागरिकांचे देशाच्या विकासात योगदानाचे महत्व लक्षात घेऊन तसेच त्यांची मातृभूमीशी नाळ कायमची जोडली जावी या उद्देशाने भारतात 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उल्लेखनीय काम केलेल्या अनिवासी भारतीयांना प्रतिष्ठेचा 'प्रवासी भारतीय पुरस्कार' देण्यात येतो. अनिवासी भारतीयांच्या संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रवासी भारतीय दिनाचे हे व्यासपीठ महत्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या या वर्षीच्या 16 व्या प्रवासी भारतीय दिवसाची थीम ही 'आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान' (Contributing to Aatmanirbhar Bharat) अशी आहे.

'सर्वात मोठा प्रवासी' गांधीजींचं भारतात आगमन मोहनदास करमचंद गांधी हे 1883 सालाच्या सुमारास एका खटल्यासंबंधी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला आणि कृष्णवर्णीयांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. त्यानंतर 9 जानेवारी 1915 साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

NRI | अनिवासी भारतीयांना मिळणार मतदानाचा अधिकार, निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारकडं प्रस्ताव

भारतातील या सर्वात मोठ्या प्रवाशाच्या आगमनानिमित्त 2003 सालापासून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जायचा पण 2015 सालापासून प्रत्येक दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जातोय.

कोण आहेत प्रवासी भारतीय? मूळचे भारतीय वंशाचे पण सध्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या नागरिकांना प्रवासी भारतीय म्हटलं जातं. सरकारच्या एका अहवालाच्या मते, जगभरातील 110 देशांमध्ये जवळपास अडीच कोटी मूळ भारतीय वंशाचे नागरिक वास्तव करत आहेत. या लोकांनी विदेशात राहूनही आपल्या देशाची संस्कृती, भाषा, वारसा अशा अनेक गोष्टींची जपणूक केली आहे. या नागरिकांमुळेच जगभरात भारताला एक वेगळी ओळख मिळतेय.

देशाच्या विकासात योगदान जगभरात राहणाऱ्या प्रवासी भारतीयांचे भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. जागतिक बँकेचा मायग्रेशन अॅन्ड रेमिटन्स (MIGRATION AND REMITTANCE) नावाचा एक अहवाल असं सांगतोय की आपल्या मुळच्या देशात पैसे पाठवण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांचा जगात क्रमाक पहिला लागतोय. याच अहवालात असं सांगण्यात आलंय की 2019 साली अनिवासी भारतीयांनी देशात 83.1 अब्ज डॉलर भारतात पाठवले आहेत. भारतानंतर चीनच्या नागरिकांचा दुसरा क्रमांक लागतोय.

विजयानंतर जो बायडन, कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा, म्हणाले...

आखाती देशात राहतात सर्वात जास्त अनिवासी भारतीय भारतातून कामासाठी देशाबाहेर गेलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आखाती देशांत आहे. भारत सरकारच्या एका अहवालानुसार जवळपास 30 लाख अनिवासी भारतीय आखाती देशात काम करत आहेत. याच प्रदेशातून भारतात सर्वाधिक पैसे पाठवले जातात. त्यानंतर ब्रिटनमध्ये 10 लाख अनिवासी भारतीय तर कॅनडामध्ये अडीच लाख अनिवासी भारतीय लोक वास्तवास आहेत.

आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान या वर्षीच्या 16 व्या प्रवासी भारतीय दिनाची थीम आहे 'आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान' (Contributing to Aatmanirbhar Bharat). या निमित्ताने जगभरातील अनिवासी भारतीयांचे एक नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग भारताला एक सॉफ्ट पॉवरच्या रुपाने होणार आहे.

आतापर्यंत जवळपास 60 देशांतील 240 अनिवासी भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

US Elections : कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती; भारताशी त्यांचा काय संबंध?

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget