एक्स्प्लोर

'मोदी सत्तेतून जातीलही मात्र भाजप पुढील अनेक दशकांपर्यंत राजकारणात मजबूत राहील', प्रशांत किशोर यांचं वक्तव्य

प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राजकारणात भाजपचे (BJP) वर्चस्व राहणार आहे, असं ते म्हणाले.

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राजकारणात भाजपचे (BJP) वर्चस्व राहणार आहे. मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul Gandhi) यांची चूक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.  राहुल गांधी हे भाजप मोदी लाट असेपर्यंत सत्तेत राहणार आहेत या भ्रमात आहेत, असंही ते म्हणाले. मोदी सरकारने (PM Narendra Modi) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही, असंही ते म्हणाले. राहुल गांधी आणि काँग्रेसनं वेळीच नरेंद्र मोदींची ताकद समजली पाहिजे. येत्या काही दशकांपर्यंत भाजपचं स्थान मजबूत असेल. शिवाय काही मुद्द्यांच्या आधारे नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवू शकतो, असं मानणं ही चूक असू शकते, असा इशारा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिलाय. पुढची आणखी काही वर्षे काँग्रेस आणि विरोधकांना भाजपविरोधात मोठा लढा द्यावा लागेल, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं. गोव्यात तृणमूल काँग्रेससाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी हा इशारा दिला.

प्रशांत किशोर गोव्यात एका कार्यक्रमात म्हणाले की, भाजप कुठेही जाणार नाही. भाजपा जिंकेल किंवा हरेल मात्र काँग्रेसच्या 40 वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. तुम्हाला भारतात 30 टक्के मते मिळाली की तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. लोकं संतप्त होऊन मोदींना हटवून टाकतील या गैरसमजात पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजप कुठंही जाणार नाही. पुढील अनेक दशकं तुम्हाला भाजपचा सामना करावा लागेल असंही ते म्हणाले.

त्यांनी म्हटलं की, राहुल गांधींची हीच अडचण आहे. बहुधा, त्यांना असे वाटते की ही फक्त थोड्या वेळेची बाब आहे, जोपर्यंत लोक मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत तोपर्यंत. ते होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकत समजून घेत नाही आणि त्यांची ताकत स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहित असेल तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल, असं प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर म्हणाले की, तुम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे जा, ते तुम्हाला सांगतील ही थोड्या वेळेची गोष्ट आहे. ही काळाची बाब आहे, लोक कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील. मला शंका आहे, असे होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Embed widget