एक्स्प्लोर
Advertisement
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घरात घुसून पोलिसावर गोळीबार
काश्मीर: काश्मीरमधील कुलगाममध्ये घरात घुसून जवानावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) घडली आहे. या हल्ल्यात जवान शहीद झाल्याची माहिती समजते आहे. शबीर अहमद असं या जवानाचं नाव असून ते सुट्टीवर घरी आले होते.
दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर शबीर यांना तातडीनं रूग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे कुतरसू गावात दहशतवाद्यांनी गावातील महिलेवर निशाणा साधला. सुराया असं या जखमी महिलेचं नाव आहे. तिच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून कश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. लष्कराच्या कमांडरसह सुरक्षा बलातील अधिकारी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लष्करानं 12 दहशतवाद्यांची एक यादी तयार केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement