एक्स्प्लोर

Poet Gaddar Death: तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचं निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gaddar Death: तेलंगणातील प्रसिद्ध गायक गद्दार यांचे निधन झाले आहे. 1980 च्या दशकात तेलंगणा राज्य स्थापनेच्या दरम्यान आणि नंतर क्रांतिकारी गाण्यांसाठी गायक गद्दार लोकप्रिय होते.

Gaddar Death: दक्षिण भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी आहे. तेलंगणातील प्रसिद्ध लोकगायक आणि गीतकार गदर (Singer Gaddar Death) यांचं रविवारी (6 ऑगस्ट) रोजी निधन झालं आहे. क्रांतिकारी गीतांसाठी नावाजलेले 'गदर ' यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असं होतं. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली होती.  त्यांच्यावर हैदराबादमधील (Hyderabad) एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते, त्या दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

गुम्मडी विठ्ठल राव (Gummadi Vittal Rao) हे त्यांच्या रंगमंचाच्या नावाने लोकप्रिय होते. त्यांना हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेलंगणातील लोकांवरील त्यांच्या (गदर ) प्रेमामुळे त्यांना उपेक्षितांसाठी अथक लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा वारसा आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील.

'हे' ठरलं मृत्यूचं कारण

गुम्मडी विठ्ठल राव यांचं फुफ्फुस आणि लघवीच्या त्रासामुळे हैदराबादच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांना हृदयविकाराच्या गंभीर आजाराने ग्रासलं होतं, त्यांना 20 जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ते बरेही झाले होते. पण, त्यांना फुफ्फुस आणि लघवीच्या समस्या देखील होत्या, ज्या वयानुसार वाढत गेल्या आणि हेच त्यांच्या निधनाचं कारण बनलं.

राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक

प्रसिद्ध गायक गदर यांच्या निधनाने सर्वांनाच दु:खं झालं आहे. अभिनेत्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच गदर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील गदर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलं की, "तेलंगणातील प्रख्यात कवी, गीतकार आणि कार्यकर्ते श्री गुम्मडी विठ्ठल राव यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. तेलंगणातील लोकांबद्दलचं त्यांचं प्रेम इतरांनाही लढण्यासाठी प्रेरित करते. त्यांचा वारसा आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील."

पूर्वी नक्षलवादी होते गदर

गायक गदर 2 जुलै रोजी तेलंगणातील खम्मम येथे राहुल गांधींनी संबोधित केलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर अनेक नेत्यांनीही गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गायक होण्यापूर्वी, गदर हे नक्षलवादी होते, त्यांनी जंगलासह भूमिगत जीवन जगलं. 1980च्या कालखंडात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सदस्य झालेले गदर हे संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते. 

हेही वाचा:

Indian Actor in China: चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय अभिनेत्याचा डंका; बॉलीवूडमधील अभिनेत्यांनाही देतोय टक्कर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Embed widget