एक्स्प्लोर
पंतप्रधानांच्या ताफ्यात किती गाड्या? पीएमओचं उत्तर...
या वाहनांचे प्रकार, खरेदीचं वर्ष, किंमत, पंतप्रधानांच्या सुरक्षेत असलेल्या वाहनांची संख्या आणि या वाहनांवर 2017, 2016, 2015 तसंच 2014 मध्ये खर्च झालेल्या इंधनाची माहिती डॉ. नुतन ठाकूर यांनी मागितली होती.
लखनौ : माहिती अधिकाराअंतर्गत पंतप्रधानांच्या वाहनांच्या संबंधात मागितलेली माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे. लखनौच्या आरटीआय कार्यकर्त्या डॉ. नुतन ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासोबत असलेल्या वाहनांबाबत आरटीआयअंतर्गत माहिती मागितली होती.
या वाहनांचे प्रकार, खरेदीचं वर्ष, किंमत, पंतप्रधानांच्या सुरक्षेत असलेल्या वाहनांची संख्या आणि या वाहनांवर 2017, 2016, 2015 तसंच 2014 मध्ये खर्च झालेल्या इंधनाची माहिती डॉ. नुतन ठाकूर यांनी मागितली होती.
परंतु हे प्रकरण स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपशी (एसपीजी) संबंधित आहे, जे आरटीआय कायद्याच्या कलम 24 मध्ये निषिद्ध आहे, असं सांगत पीएमओचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण कुमार यांनी ही माहिती देण्यास नकार दिला.
याउलट उपराष्ट्रपती कार्यालयाकडेही हीच माहिती मागितली होती. यावेळी उपराष्ट्रपती कार्यालयाकडे एकूण नऊ वाहनं असल्याचं उपराष्ट्रपती सचिवालयाने सांगितलं. तसंच कार्यालयाने वाहनांच्या किंमतीसह मागील चार वर्षांत इंधनाच्या वापराचीही माहिती दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement