एक्स्प्लोर
भारत-चीन सीमेवर पंतप्रधान मोदींची जवानांसोबत दिवाळी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली दिवाळी भारतीय जवानांसोबत साजरी करणार आहेत. नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या माणामधील भारत-चीन सीमेवर जाऊन तिथे भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देतील.
अजित डोभालही मोदींसोबत
सकाळी बद्रीनाथचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतील. सकाळी वायुसेनेच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान मोदी गौचरला पोहोचतील. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील असतील.
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा
सुरक्षेच्या कारणामुळे मोदींच्या या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नाहीय. या दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारण सर्जिकल स्ट्राईक आणि सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन लक्षात घेता, मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आलीय.
दरम्यान, याआधीही पंतप्रधान मोदींनी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. गेल्यावर्षी अमृतसरमधील खालसास्थित डोगराई वॉर मेमोरियलमध्ये सियाचिनमधील जवानांसोबत पंतप्रधान मोदींनी दिवाळी साजरी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement