एक्स्प्लोर

मोदींकडून महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचं गिफ्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या पूर्व संध्येला मोठं गिफ्ट दिलं आहे. व्यापारी, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि महिलांसाठी पंतप्रधान मोदींनी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजना स्वातंत्र्यानंतरही देशात आजही अनेकांना हक्काचं घर उपलब्ध नसल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी खंत व्यक्त केली. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात मध्यमवर्गीयांना हक्काचं घर देण्यासाठी केंद्र सरकारने खास योजना आखली आहे. शहरात 2017 मध्ये घर तयार करण्यासाठी 9 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 4 टक्के सूट आणि 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के सूट मिळणार आहे. गावांमध्ये घर तयार करण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 3 टक्के सूट मिळेल. शिवाय ज्यांना आपल्या घराचा विस्तार करायचा आहे, त्यांना बांधकामासाठी व्याज मिळेल. लघुउद्योगांना चालना लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी मोठा निर्णय घेतलाय. लघुउद्योग सुरु करण्यासाठी आता एक कोटींऐवजी 2 कोटी रुपयांचं कर्ज मिळेल. याची खात्री केंद्र सरकार देणार आहे, असंही मोदींनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी घोषणा पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँका आणि सोसायटी बँकांकडून खरिप किंवा रब्बी हंगामासाठी कर्ज घेतलं होतं, त्यांचं 60 दिवसांचं कर्ज केंद्र सरकार भरेल, अशी घोषणा मोदींनी केली. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. येत्या तीन महिन्यात 3 कोटी किसान क्रेडिट कार्डचं रुपांतर रुपे कार्डमध्ये करण्यात येईल, असंही मोदींनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या किसान क्रेडिट कार्डचा वापर डेबिट कार्ड म्हणून करता येईल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना देशातील माता मृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक गर्भवती मातेला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे महिलेला या पैशातून पोषक आहार घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांनाही मोदींनी नव्या वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना साडे सात लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर 8 टक्के व्याजदर मिळणार आहे. गैरव्यवहार करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना सोडणार नाही : मोदी देशातील जनतेने नोटाबंदीनंतर मोठा संयम दाखवला. बँक कर्मचारी, पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठी मेहनत घेतली. मात्र काही ठिकाणी गैरप्रकार झाले. असे गैरप्रकार करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही मोदींनी दिला. बँकांना आवाहन नोटाबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. आपल्याच पैशांसाठी लोकांना रांगेत उभं रहावं लागलं. अनेकांनी होणारा त्रास आपल्याला कळवला, असं मोदींनी सांगितलं. बँकांनी आता पारंपारिक कामकाज बाजूला ठेवून शेतकरी, गरीब, मध्यमवर्गींयांना केंद्रस्थानी ठेवून कामकाज करावं, असं आवाहन मोदींनी केलं. LIVE UPDATES : दिवाळीनंतर आपला देश ऐतिहासिक शुद्धी यज्ञात सहभागी झालाय देशवासियांनी झेललेले कष्ट भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नागरिकांच्या त्यागाचा आदर्श आहे गरिब जनता आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे नोटाबंदी देशवासियांनी अच्छाई सच्चाईला साथ दिली दिवाळीनंतर देशात ऐतिहासिक स्वच्छतेचा यज्ञ नववर्षात नागरिकांना होणारा त्रास कमी होणार हे सरकार सज्जनांचं आहे आणि दुर्जनांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील देशात फक्त 24 लाख दशलक्षपतीच आहेत का? बँक आणि पोस्टातील कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. मात्र काही ठिकाणी गैरप्रकारही झालेत अशा निर्लज्ज प्रकारांना खपवून घेतलं जाणार नाही यापूर्वी बँकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आले नव्हते बँकांनी आपली कार्यपद्धती बदलत गरिब शेतकरी आणि मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करावं जेव्हा चांगल्या विचारांनी योजना बनवल्या जातात त्याने मोठ्या प्रमाणावर चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसतात महिला जेवढ्या स्वयंपूर्ण होतील तेवढाच देश सशक्त होईल स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही घर नसलेल्या गरिबांची संख्या मोठी प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी भागात 2017 मध्ये 9 लाखांपर्यंत कर्जावर व्याजात 4 टक्के सूट 12 लाख कर्जावर व्याजात 3 टक्के सूट ग्रामीण भागात 2017 घर बांधणी आणि दुरुस्तीसाठी 20लाखापर्यंत कर्जाच्या व्याजात 3 टक्के सूट जिल्हा बँका आणि प्राथमिक बँकातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं 60 दिवसांचं व्याज सरकार भरणार नाबार्डचं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी 20 हजार कोटी सरकार देणार 3 कोटी किसान क्रेडिट कार्डना रुपे कार्डमध्ये बदललं जाईल भारत सरकार विश्वास देतं की बँकांनी दोन कोटी रुपयांपर्यंतच कर्ज बँकांनी द्यावं सरकारची ग्वाही यातून छोट्या उद्योगांना चालना मिळेल तसंच त्यावर व्याजदर कमी असेल डिजिटल ट्रान्झक्शनवरील कर्जाची मर्यादा 20 टक्क्यांवरुन 30 टक्क्यांवर 2 कोटींपर्यंतच्या व्यापार करणाऱ्या गर्भवती महिलांसाठी देशव्यापी योजना हॉस्पिटलमध्ये नोंदणी, बाळंतपण, औषधं, आणि पौष्टिक आहारासाठी 6500 रुपये देणार बँकेत जास्त पैसे आल्यावर बँक कमी व्याज देते जेष्ठ नागरिकांना साडेसात लाखांपर्यंत रकमेवर दहा वर्षांपर्यंत 8 टक्के व्याज देण्यात येईल राजकीय पक्षांनी जनतेचा आक्रोश समजून घ्यावा लघुउद्योगांसाठी 1 कोटीऐवजी 2 कोटींचं कर्ज मिळणार भिमचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा शंभर वर्षापूर्वी चंपारण्यात सत्याग्रह आंदोलन केलं होतं आजही या संस्कारांचं सकारात्मक मूल्य आहे भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईला आपण सुरु ठेवायचं आहे आपल्या देशाला मागे राहण्याचं कोणतही कारण राहणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget