400th Parkash Purab of Guru Tegh Bahadur : 400 रुपयांचं नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण
गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 400 रुपयांचं नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं.
![400th Parkash Purab of Guru Tegh Bahadur : 400 रुपयांचं नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण PM Narendra Modi releases postal stamp, ₹400 coin on 400th Parkash Purab of Guru Tegh Bahadur 400th Parkash Purab of Guru Tegh Bahadur : 400 रुपयांचं नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/22/6e73f8cf64ebcb812c3ef34d9945f61a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : शीख समुदायाचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुवारी (21 एप्रिल) 400 रुपयांचं नाणे आणि टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 400 रुपयांचं नाणं आणि टपाल तिकीट जारी केलं. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज मला गुरुंना समर्पित स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचें अनावरण करण्याचं भाग्य लाभलं आहे आणि याला मी गुरुंची माझ्यावर असलेली कृपा मानतो. मला आनंद आहे की आज आपला देश आपल्या गुरुंच्या आदर्शांवर पूर्ण निष्ठेने पुढे जात आहे. या पुण्यप्रसंगी मी सर्व दहा गुरुंच्या चरणी नतमस्तक होतो."
हे नाणं चलनात वापरलं जाणार नाही, फक्त संग्रहात ठेवणासाठी नाण्याचं अनावरण करण्यात आलं आहे.
Prime Minister Narendra Modi releases a commemorative coin and postage stamp on the occasion of the 400th Parkash Purab celebrations at Red Fort, Delhi. pic.twitter.com/voE4KWRO5Q
— ANI (@ANI) April 21, 2022
"आपला देश आज संपूर्ण निष्ठेने गुरुंच्या आदर्शांवर पुढे जात आहे. या पुण्यदिनी मी सर्व गुरुंना नमन करतो. तसंच सर्व देशवासीयांना आणि संपूर्ण जगातील गुरुवाणीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मी प्रकाश पर्वाबद्दल अभिनंदन करतो. ही भारतभूमी केवळ एक देश नाही नाही तर मोठा वारसा आणि परंपरा आहे. याला हे आपल्या ऋषीमुनींनी, गुरुंनी शेकडो हजारो वर्षांच्या तपश्चर्येने आणि त्यांच्या विचारांना समृद्ध केलं आहे," असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, "लाल किल्ल्याने गुरु तेग बहादूरजींचे हौतात्म्य पाहिले आहे आणि या देशातील लोकांचे धैर्यही पाहिले आहे. आज आपण जिथे आहोत ते लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे," असं मोदी पुढे म्हणाले. "आज आपला देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आणि गुरु तेग बहादूरजींचा 400 वा प्रकाश पर्व साजरा करत आहे. लाल किल्ल्याजवळ गुरुजींच्या बलिदानाचे प्रतीक, सिस गंज साहिब गुरुद्वारा आहे. गुरुद्वारा आपल्या महान संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या बलिदानाच्या महानतेची आठवण करुन देतो," असं मोदींनी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)