एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ, राष्ट्रपती भवनात 58 मंत्र्यांचा शपथविधी

महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : मैं नरेंद्र दामोदरदास मोदी....असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि राष्ट्रपती भवनाच्या साक्षीने मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्तापर्वाचा शुभारंभ झाला. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन यांच्यासह 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता विविध पक्षांचे दिग्गज नेते, कलाकार, उद्योगपती यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा रंगला. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांसह अंबानी कुटुंब, शाहरुख खान, करण जोहर, कंगना राणावत यासारखे कलाकार उपस्थित होते. 43 वर्षीय स्मृती इराणी या मोदी मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. तर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असलेले 72 वर्षीय रामविलास पासवान हे सर्वात वयोवृद्ध मंत्री आहेत. शरद पवारांनी अवमानामुळे अनुपस्थिती टाळली शरद पवार शपथविधी सोहळ्याला हजेरी न लावताच मुंबईला परतले आहेत. पवारांना पाचव्या रांगेतील पास देण्यात आला होता, याकडे लक्ष वेधूनही पास बदलून देण्यात आला नाही. आपल्या ज्येष्ठतेचा अनादर झाल्याची भावना पवारांच्या मनात असल्याचं म्हटलं जातं. हिराबेन टीव्हीवरुन साक्षीदार विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन टीव्हीवरुन हा शपथविधी पाहत असल्याचे फोटो अल्पावधीतच सोशल मीडियावर वायरल झाले. मुलाला आशीर्वाद देण्यासाठी हिराबा राजधानीत उपस्थित राहू शकत नसल्या, तरी त्यांनी टीव्हीवरुन भरभरुन शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ, राष्ट्रपती भवनात 58 मंत्र्यांचा शपथविधी #मराठीतशपथ हवेतच मराठीतून शपथ घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांनी सोशल मीडियावरुन उचलून धरली होती. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मराठीतून शपथ घेण्याचं कबूलही केलं, मात्र सावंत, दानवे, गडकरी, आठवले यांनी हिंदीतूनच शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेणारे चेहरे
  1. नरेंद्र मोदी - उत्तर प्रदेश
  2. राजनाथ सिंह - उत्तर प्रदेश
  3. अमित शाह - गुजरात
  4. नितीन गडकरी - महाराष्ट्र
  5. सदानंद गौडा - कर्नाटक
  6. निर्मला सीतारमन - तामिळनाडू
  7. रामविलास पासवान - बिहार, (लोकजनशक्ती पक्ष)
  8. नरेंद्र सिंग तोमर - मध्य प्रदेश
  9. रवीशंकर प्रसाद - बिहार
  10. हरसिमरत कौर बादल - पंजाब, (शिरोमणी अकाली दल)
  11. थावरचंद गहलोत - मध्य प्रदेश
  12. सुब्रह्मण्यम जयशंकर - निवृत्त परराष्ट्र सचिव
  13. रमेश पोखरियाल निशंक- उत्तराखंड (माजी मुख्यमंत्री, भाजप)
  14. अर्जुन मुंडा - झारखंड (माजी मुख्यमंत्री, भाजप)
  15. स्मृती इराणी - उत्तर प्रदेश
  16. डॉ. हर्ष वर्धन - नवी दिल्ली
  17. प्रकाश जावडेकर - महाराष्ट्र
  18. पियुष गोयल - महाराष्ट्र,
  19. धर्मेंद्र प्रधान - ओदिशा
  20. मुख्तार अब्बास नक्वी - उत्तर प्रदेश
  21. प्रल्हाद जोशी - कर्नाटक
  22. अरविंद सावंत - महाराष्ट्र, (शिवसेना)
  23. महेंद्रनाथ पांडे - उत्तर प्रदेश
  24. गिरीराज सिंह - बिहार
  25. गजेंद्र सिंह शेखावत - राजस्थान
  26. संतोष गंगवार -
  27. इंद्रजीत सिंह - हरियाणा
  28. श्रीपाद नाईक - गोवा
  29. जितेंद्र सिंह - जम्मू काश्मिर
  30. किरन रीजिजू - अरुणाचल प्रदेश
  31. प्रल्हाद पटेल - मध्य प्रदेश
  32. आर के सिंह - बिहार
  33. हरदीपसिंह पुरी - पंजाब
  34. मनसुख मांडवीय - गुजरात
  35. फग्गनसिंह कुलस्ते - मध्य प्रदेश
  36. अश्विनीकुमार चौबे - बिहार
  37. अर्जुन मेघवाल - राजस्थान
  38. व्ही के सिंह - उत्तर प्रदेश
  39. कृष्णपाल गुर्जर - हरियाणा
  40. रावसाहेब दानवे - महाराष्ट्र
  41. किशन रेड्डी - तेलंगणा
  42. पुरुषोत्तम रुपाला - गुजरात
  43. रामदास आठवले - महाराष्ट्र (रिपाइं)
  44. साध्वी निरंजन ज्योती - हिमाचल प्रदेश
  45. बाबुल सुप्रियो - पश्चिम बंगाल
  46. संजीव कुमार बालियान - मुजफ्फरपूर
  47. संजय धोत्रे - अकोला
  48. अनुराग ठाकूर - हिमाचल प्रदेश
  49. सुरेश अंगडी - बेळगाव
  50. नित्यानंद राय - बिहार
  51. रतनलाल कटारिया - पंजाब
  52. वी मुरलीधरन - केरळ
  53. रेणुका सिंह सरुता - छत्तीसगड
  54. सोमप्रकाश - पंजाब
  55. रामेश्वर तेली - आसाम
  56. प्रतापसिंह सारंगी - ओदिशा
  57. कैलाश चौधरी - राजस्थान
  58. देबश्री चौधरी - पश्चिम बंगाल
मोदी मंत्रिमंडळात स्थान नसलेले चेहरे अरुण जेटली सुषमा स्वराज सुरेश प्रभू एम जे अकबर मेनका गांधी मनोज सिन्हा सुभाष भामरे हंसराज अहिर महेश शर्मा जे पी नड्डा राज्यवर्धनसिंह राठोड
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
Bondi Beach Terror Attack: ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
Embed widget