Bihar Election 2020 : बिहारच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं, जंगलराजचाही पराभव; पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी, एकाच दिवशी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या सभांचा धडाकाबिहारच्या जनतेने अहंकार नाकारला, कायद्याच्या राज्याचा विजय होत आहे, असं नरेंद्र मोदींचं वक्तव्य.
Bihar Election 2020 : बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 94 जागांसाठी मतदान होत असताना दुसरीकडे तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात रंग भरत आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी प्रत्येकी दोन सभा घेत आहेत. त्याचवेळी नितीश कुमार आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचाही प्रचाराचा धडाका आज सुरु राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली रॅली अरजिरा जिल्ह्यात आहे तर दुसरी रॅली ही सहरसामध्ये होत आहे. त्याचवेळी कॉंग्रेस नेता राहुल गांधींची पहिली रॅली ही कटिहार मध्ये तर दुसरी रॅली ही एमआयएमचे प्रमुख ओवेसींचे प्राबल्य असणाऱ्या किशनगंजमध्ये असेल.
तेजस्वी यादव 12 रॅलींचं संबोधन करणार
आरजेडीचे स्टार प्रचारक आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव मंगळवारी एकूण 12 रॅलींना संबोधित करणार आहेत. सहरसा, सुपौल, मधेपुरा आणि दरभंगा या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत तर मुख्यमंत्री नितीश कुमार मुजफ्फरपूर, मधुबनीपासून मधेपूरापर्यंत सात रॅलींना संबोधित करणार आहेत.
पाहा व्हिडीओ : बिहार विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, नितीश कुमार यांनी हक्क बजावला
17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी आज मतदान
बिहार विधानसभा च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 94 विधानसभा क्षेत्रांत आज मतदान होणार आहे. या जागा राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये आहेत ज्यामध्ये पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, भागलपूर, नालंदा आणि पाटनाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत 1463 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले असून त्यामध्ये 146 महिला आणि एका तृतियपंथी उमेदवारांचा समावेश आहे.
मोदींचा विरोधकांवर हल्ला
यादरम्यान फारबिसगंज मध्ये एका प्रचारसभेदरम्यान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, "या दशकात बिहारला एका नव्या उंचीवर घेऊन जायचं असे बिहारच्या पवित्र भूमीने ठरवले आहे. बिहारच्या जनतेने जंगलराज आणि डबल-डबल युवराजांना नाकारले आहे. आज एनडीएच्या विरोधात जे लोक उभे आहेत त्यांनी आतापर्यंत इतकं खाल्ल्यानंतरही त्यांच्या नजरेत लालसा दिसत आहे. परंतु बिहारची जनतेला माहित आहे की बिहारच्या विकासासाठी कोण प्रयत्न करतंय आणि कोण आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी प्रयत्न करतंय."
ते पुढे म्हणाले की, "आज अहंकाराचा पराभव होतोय आणि परिश्रमाचा विजय होत आहे. बिहारमध्ये घोटाळा हारत आहे आणि अधिकारांचा विजय होत आहे. गुंडागर्दी हारत आहे आणि कायद्याच्या राज्याचा विजय होत आहे. याआधी विरोधकांनी निवडणूका या एक तमाशा बनवला होता आणि बिहारची जनता हे विसरणार नाही. या लोकांनी राज्यात जंगलराज माजवला होता आणि सामान्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता."
"निवडणूका या लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये भाग घेण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे देशाला उज्वल भविष्याची हमी मिळते. कोरोनाच्या काळातही बिहारची जनता मतदानासाठी बाहेर पडत आहे ही गोष्ट सगळ्या जगासाठी आशादायक आहे" असेही पंतप्रधानांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- Bihar Election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठा पणाला
- बिहारच्या ऐन रणधुमाळीत प्रशांत किशोर गायब, पीकेंच्या अलिप्ततेमागे कुठली रणनीती दडलीय?
- Bihar Election: माता भगिनींनो छटपूजेची तयारी सुरु करा तुमचा पुत्र दिल्लीत बसला आहे, नरेंद्र मोदींचे आवाहन