एक्स्प्लोर

PM Modi Speech : वैद्यकीय शिक्षणाबाबत लाल किल्ल्यावरून पीएम मोदींची मोठी घोषणा; म्हणाले, पुढील पाच वर्षात...

Independence day PM Modi Speech : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना वैद्यकीय शिक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे.

PM Narendra Modi Speech : वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical Education) भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत आहे. त्यामुळे आता येत्या पाच वर्षात 75 हजार जागा वाढवण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2024) लाल किल्ल्यावरुन भाषण करताना ते बोलत होते. 

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकावला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

मेडिकल क्षेत्रात 75 हजार नव्या जागा निर्माण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुले देशाबाहेर जात आहेत. यामध्ये जास्त करुन मध्यवर्गीय कुटुंबातील मुले आहेत, यासाठी मुलांचे करोडो रुपये खर्च होतात. सुमारे 25 हजार तरुण दरवर्षी मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशात जातात. कधी कधी अशा देशात जावे लागते की मी विचार केला तर हैराण व्हायला होते. त्यामुळे गेल्या 10 वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या 1 लाख केल्या आहे. येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात 75 हजार नव्या जागा तयार केल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

नव्या धोरणामुळे प्रत्येक क्षेत्राला ताकद

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आज माझ्या देशातील तरुणाला हळूहळू चालायचे नाही. देशातील तरुणाला थेट भरारी घ्यायची आहे. भारताचा हा सुवर्णकाळ असून आपल्याला संधी गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. एमएसएमई, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात नवी आणि आधुनिक यंत्रणा उभी राहत आहे. आपण आपल्या देशातील परिस्थितीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. आमच्या नव्या धोरणामुळे प्रत्येक क्षेत्राला ताकद मिळत आहे.   

आणखी वाचा 

PM Modi Speech: पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे, आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं: मोदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | संदीप क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी? प्रकरण काय?Job Majha : पुणे महानगरपालिका - NUHM अंतर्गत विविध पदांसाठी भरती : 10 March 2025Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवारBudget Superfast | अर्थ बजेटचा | अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधून  सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
Embed widget