(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : 'महापुरुष लक्षद्वीपमध्ये जाऊन फोटो काढू शकतात, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत?', काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
Mallikarjun Kharge on PM Modi : 'लक्षद्वीपमध्ये जाणून पाण्यात फोटो काढू शकता, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत?', असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
Kharge on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीपमधील (Lakshdweep) फोटोंची (Photos) काँग्रेसकडून (Congress) खिल्ली उडवण्यात आली आहे. 'लक्षद्वीपमध्ये जाणून पाण्यात फोटो काढू शकता, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत?', असा सवाल काँग्रेस अध्यक्ष (President of the Indian National Congress) मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केला आहे. अलिकडे लक्षद्वीपच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून विरोधकांनी मात्र, पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांच्या लक्षद्वीपमधील फोटोची खिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य केलं. खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, ''नवनवीन कपडे घालून रोज वेगवेगळे फोटो काढतात. तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल. तुम्हालाही याचा कंटाळा आला असेल की, किती वेळा यांचं तोंड बघायचं. तरीही ते तोंड दाखवणं सोडत नाही आणि तुम्हीही त्यांचे फोटो काढणं सोडत नाहीत. आज लोकांना असं वाटत आहे की, हे नक्की काय चाललंय?''
'लक्षद्वीपमध्ये जाऊ शकता, मग मणिपूरमध्ये का नाही?'
''रोज सकाळी देवाचं दर्शन घ्यावं तसं ही व्यक्ती दर्शन देते, मग हे मणिपूरमध्ये का जात नाही. हे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत, जिथे लोक मरत आहेत, जिथे महिलांवर अत्याचार होत आहेत. जिथे लोकांचा थंडीत मृत्यू होतं आहे, अशा ठिकाणी ते जनतेची विचारपूस करायला जात नाहीत. का? ते देशाचा भाग नाहीत? तुम्ही लक्षद्वीपमध्ये जाणून पाण्यात फोटो काढू शकता, पण मणिपूरमध्ये जाऊन जनतेला समजावू शकत नाहीत?'' असं म्हणत खरगे यांनी पंतप्रधानांच्या लक्षद्वीपमधील फोटोची खिल्ली उडवली आहे.
अजून किती दिवस याकडे दुर्लक्ष करणार?
यावेळी खरगे यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, 'पूर्ण सत्ता तुमच्याकडे आहे. तुम्ही तर हेच सांगता की, मी देशात एकच असा व्यक्ती आहे, ज्यांना विरोधकही अडवू शकत नाहीत, असं त्यांनीच संसदेत सांगितलं आहे. जर एक मोदी विरोधकांसाठी पुरेसे आहेत, तर मणिपूरमध्ये जाऊन बघा, तिथली परिस्थिती बघा, असं का होतंय? तोही देशाचा भाग आहे. अजून किती दिवस तुम्ही याकडे दुर्लक्ष करणार आहात? म्हणून जनजागृती करण्यासाठी आम्ही यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.'