एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील लॉकडाऊन वाढवणं अपरिहार्य; पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत माहिती
देशातील लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्यता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागितल्याचं ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 14 एप्रिला या लॉकडाऊनची मर्यादा संपणार आहे. मात्र, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, अशी माहिती दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिली. या दोघांनीही यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे. देशातील लॉकडाऊन विषयी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही राज्यातील मुख्यमंत्री यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.
आजच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. हे लॉकडाऊन नसून लोकइन असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. उद्याच्या उज्वल भारतासाठी माणसांचा जीव सर्वकाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम राहणार आहे. या काळात सर्व बॉर्डर बंद राहतील. जे कामगार अडकले आहेत, तेही राज्य सोडून जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात कोरोनाबाबत एकच भूमिका राहणार असल्याचंही ते म्हणाले. आता लॉकडाऊन काढले तर जे मिळवले ते सर्व जाईल, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार असल्याचं त्यांनी सांगितले. येत्या 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, काही राज्यांनी हे लॉकडाऊन वाढण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
राज्यांमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय देशातील अनेक राज्यांनी आता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात अगोदर तेलंगाणा सरकारने लॉकडाऊन तीन महिने वाढवले आहे. तीन जूनपर्यंत तेलंगाणामध्ये लॉकडाऊन असणार आहे. तेलंगाणा पाठोपाठ आता महाराष्ट्रातही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. Lockdown Yoga With Madhavi Nimkar | लॉकडाऊन योगा माधवी निमकरसोबत, घरच्या घरी करता येणारी योगासनंPM has taken correct decision to extend lockdown. Today, India’s position is better than many developed countries because we started lockdown early. If it is stopped now, all gains would be lost. To consolidate, it is imp to extend it
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement