पंतप्रधान मोदींच्या वर्गशिक्षकाचं निधन, ट्वीट करत मोदींनी दिला आठवणींना उजाळा
PM Modi Teacher Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे वर्गशिक्षक रासबिहारी मनियार यांचं निधन झालं आहे.
PM Modi Teacher Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे वर्गशिक्षक रासबिहारी मनियार यांचं निधन झालं आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोटोसह एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविद्यालयातील शिक्षकाचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यावर त्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. पीएम मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय की, माझ्या यशात आणि जडणघडणीत रासबिहारी मनियार यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिव दुख झालेय.
ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेय मोदींनी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, "महाविद्यालयातील शिक्षक रासबिहारी मनियार यांच्या निधानाची बातमी ऐकून आतिव दु:ख झालेय. माझं आयुष्य घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. माझ्या यशामध्ये त्यांचं अमुल्य योगदान आहे. आतापर्यंत मी त्यांच्याशी जोडला गेलेलो आहे. आयुष्यभर त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं, याचं समाधान आहे."
મારી શાળાના શિક્ષક રાસબિહારી મણિયારના અવસાનના સમાચાર સાંભળી ખૂબ જ વ્યથિત છું.
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2022
મારા ઘડતરમાં તેમનો અમૂલ્ય ફાળો છે. હું જીવનના આ પડાવ સુધી તેમની સાથે જોડાયેલો રહ્યો અને એક વિદ્યાર્થી હોવાના નાતે મને સંતોષ છે કે જીવનભર મને તેમનું માર્ગદર્શન મળતું રહ્યું. pic.twitter.com/QmlJE9o07E
व्हिडीओही केला पोस्ट -
गुरु रासबिहारी यांच्या आठवणीला उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. १८ सेकंदाच्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर रासबिहारी यांना सन्मानित करताना दिसत आहे. त्याशिवाय त्यांचे मोदींनी आशिर्वाद घेतल्याचेही व्हिडीओतून दिसतेय.
દિવંગત આત્માની શાંતિ માટે પ્રાર્થના….
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2022
ૐ શાંતિ: || pic.twitter.com/Fazj1uMEin
ही बातमी वाचायला विसरु नका -