(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
येत्या 5 वर्षात देशातील 1 कोटी युवकांचे कौशल्य विकसित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पीएम इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना एकरकमी 6 हजार रुपये आणि दरमहा 5 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.
PM Internship Scheme 2024 : तरुणांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट पीएम इंटर्नशिप (PM Internship Scheme 2024) योजना सुरू केली आहे. यासाठी 12 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. इंटर्नशिप एक वर्षासाठी असेल आणि निवडलेल्या तरुणांना दरमहा 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, इंटर्नशिपच्या सुरुवातीलाच एकरकमी 6,000 रुपये दिले जातील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेची माहिती दिली होती. पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. येत्या 5 वर्षात देशातील 1 कोटी युवकांचे कौशल्य विकसित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पीएम इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना एकरकमी 6 हजार रुपये आणि दरमहा 5 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.
12 ऑक्टोबरपासून पीएम इंटर्नशिपसाठी अर्ज
चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या योजनेसाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. देशातील अनेक कंपन्यांनी या योजनेत रस दाखवला आहे. अलीकडेच, प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्म EaseMyTrip ने पुढील 3 ते 6 महिन्यांत 500 हून अधिक इंटर्नच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांच्या गरजेनुसार इंटर्नशिपची माहिती देतील.
पीएम इंटर्नशिपसाठी अर्ज या वेबसाइटद्वारे केला जाईल
पीएम इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवार १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून www.pminternship.mca.gov.in वेबसाइटवर नोंदणी करू शकतील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत कंपन्यांना दिली जाईल. या पोर्टलवर नोंदणीसाठी सरकारने विजयादशमीचा शुभ दिवस निवडला आहे. आतापर्यंत 111 कंपन्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून त्याशिवाय महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.
इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून सुरू होईल
सरकारकडून शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी मिळाल्यानंतर कंपन्या 27 ऑक्टोबरपासून अंतिम निवड करतील. यानंतर 2 डिसेंबर 2024 पासून इंटर्नशिप सुरू होईल. पीएम इंटर्नशिप योजनेत निवड झालेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देखील दिले जाईल. त्याचा हप्ता सरकार स्वतःच्या वतीने भरणार आहे. याशिवाय कंपन्या अतिरिक्त अपघात विमा संरक्षण देखील देऊ शकतात.
पीएम इंटर्नशिपसाठी पात्रता
पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तथापि, असे उमेदवार ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग बनू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या