एक्स्प्लोर
प्लास्टिकच्या स्मार्ट आधार कार्डमधून माहिती चोरी होण्याचा धोका!
प्लास्टिकने तयार झालेल्या स्मार्ट कार्डमध्ये बग असल्याचं यूआयडीएआयने म्हटलं आहे.
नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआयने प्लास्टिकने तयार झालेले स्मार्ट आधार कार्ड न वापरण्याचं आवाहन केलं आहे. असे आधार कार्ड अनेकदा काम करणं बंद करतात, असं यूआयडीएआयने म्हटलं आहे.
प्लास्टिकने तयार झालेल्या स्मार्ट कार्डमध्ये बग असल्याचं यूआयडीएआयने म्हटलं आहे. या कार्डची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे QR code खराब होतो, ज्यामुळे हे कार्ड स्कॅन केलं जाऊ शकत नाही, असं यूआयडीएआयने सांगितलं आहे.
या आधार कार्डमधून वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे याचा वापर टाळावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आधार लेटर किंवा कात्रण किंवा साध्या पेपरवर या आधारचं डाऊनलोडेड व्हर्जन योग्य असल्याचं यूआयडीएआयने सांगितलं आहे. एम-आधारच्या बाबतीतही हाच सल्ला देण्यात आला आहे.
प्लास्टिक आधारची प्रिंट काढण्यासाठी 50 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. त्यामुळे हा देखील तोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. आधार स्मार्ट कार्डची काहीही गरज नसल्याचं यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी म्हटलं आहे.
तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर तुम्ही ते eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन मोफत डाऊनलोड करु शकता. स्मार्ट कार्ड छापणाऱ्यांकडून ग्राहकांची होणारी लूट, माहिती चोरी होण्याचा संभाव्य धोका अशा गोष्टींपासून सावध राहण्यासाठी यूआयडीएआयने ग्राहकांना सतर्क केलं आहे.
आधारशी कोणतीही छेडछाड करणं Indian Penal Code and Aadhaar Act, 2016 नुसार, कायदेशीर गुन्हा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement