एक्स्प्लोर

Petrol-Diesle Price : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, एक लिटरसाठी किती पैसे मोजाल?

Petrol-Diesle Price Today on 14 April 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Petrol-Diesle Price Today on 14 April 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर जारी केले आहेत. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईनं हैराण करुन सोडलं आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. 

भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे. 

दरम्यान, एप्रिल महिन्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी गेल्या बुधवारी (6 एप्रिल) रोजी पेट्रोल-डिझेल दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये 80 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 10 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. तरीही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे. 

देशात 22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचं सत्र सुरु होतं. गेल्या 22 दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जर तुम्हीही तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी एकदा तुमच्या शहरांतील दर जाणून घ्या. 

देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय? 
 
शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 120.51 रुपये 104.77 रुपये
पुणे 120.60 रुपये 103.28 रुपये
नाशिक 120.02 रुपये  102.73 रुपये 
परभणी 123.51 रुपये 106.08 रुपये
औरंगाबाद  120.63 रुपये  103.32 रुपये 
कोल्हापूर 120.64 रुपये 103.35 रुपये
नागपूर  121.03 रुपये 103.73 रुपये

दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Petrol Diesel Price Hike : मोदी सरकारचे 'अच्छे दिन'; आठ वर्षांच्या कालावधीत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामनेABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget