एक्स्प्लोर
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ
नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. कारण पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपया 29 पैशांनी, तर डिझेलच्या किंमतीत 97 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील तेल उत्पादन कंपन्यांनी दर वाढवले आहेत.
17 डिसेंबरला पेट्रोल 2 रुपये प्रति लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपया 79 पैशांनी वाढ झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा परिणाम भारतातील तेल कंपन्यांवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय तेल कंपन्यांनाही इंधन दर वाढवावे लागले. तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला असल्याने ग्राहकांना आणखी झळ सोसावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement