एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : एक दिवसाच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले; जाणून घ्या प्रति लिटरच्या किमती

Petrol-Diesel Price Today 25 March 2022 : एका दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Petrol-Diesel Price Today 25 March 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांची धाकधुक वाढवली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात. दरम्यान, जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलामुळं भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वक्तव्य केलं आहे. 

देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत जे बदल करण्यात आले होते ते 137 दिवसांनी करण्यात आले होते. त्यापूर्वी देशात इंधन दर स्थिर होते. आता सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्यानंतर आज मात्र देशातील दर स्थिर आहेत.

देशातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

शहरं  पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
मुंबई 112.51 96.70
दिल्ली  97.81  89.07
चेन्नई 103.67  93.71
कोलकता  107.18  92.22
भोपाळ  109.85  93.35
रांची  100.96  94.08
बंगळुरु 103.11  87.37
पाटना 108.37  93.49
चंदिगढ 96.59  83.12

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ

देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून ते 21 मार्च 2022 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. पण या दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. या काळात कच्च्या तेलाची किंमत ही 82 डॉलरवरुन ती 111 डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे या तीन कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाच महिन्यांनंतर 22 आणि 23 मार्चला देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

मूडीजने आपल्या अहवालात सांगितलं आहे की, बाजारातील सध्याची स्थिती पाहता पेट्रोलियम वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर दररोज 25 डॉलर प्रति बॅरेल आणि डिझेलच्या किंमतीवर 24 डॉलर प्रतिबॅरेल नुकसान होत आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Murder case : बाबा सिद्दिकींच्या हत्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडून चार्जशीट दाखल, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती समोरSamadhan Sarvankar vs Mahesh Sawant :  दादरच्या फुल मंडईतील बँनर काढल्यानं समाधान सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वादABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 08 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
Embed widget