Asaduddin Owaisi : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार, सरकार युक्रेन-रशिया युद्धाचं कारण पुढे करणार, ओवेसींचा भाजपवर निशाणा
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
Asaduddin Owaisi on Petrol-Diesel Price Hike : आज पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीचा शेवटचा दिवस आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत आहेत. हा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. 7 मार्च किंवा 10 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सरकार यामागे युक्रेन-रशिया युद्धाचं कारण पुढे करणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. मोदी तुमच्या गाडीत पेट्रोल टाकतात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच्या मुद्यावरुन ओवेसी यांनी भाजपवर निशाणा लगावला आहे. भाजपचे लोक मोठ-मोठ्या बाता मारत असतात. मोदी तुमच्या गाडीत पेट्रोल टाकतात का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. 7 तारखेच्या रात्री किंवा 10 मार्चच्या सकाळी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतील. हे दर वाढतील आणि सांगतील की, युक्रेनमध्ये असं घडलय, तसं घडलय. काहीपण बोलतात असेही ओवेसी म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. लोकांनी त्यांच्या कारची टाकी भरली पाहिजे. कारण मोदी सरकारची पोल ऑफर संपणार असल्याचे गांधी म्हणाले होते.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरु असलेल्या निवडणूकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. पण निवडणूकीच्या निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील चार महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. पण पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ICICI Securities ने जारी केलेल्या एका रिपोर्ट्सनुसार पुढील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलीटर 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 10 मार्च रोजी पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: