Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Dharashiv Crime News : कसं चाललंय मित्रा म्हणून आवाज दिल्याने एकाने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे.
Dharashiv Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. खून, अपहरण, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे राज्यभरात घडत आहे. तर शुल्लक कारणावरून देखील गुन्हे घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने केला जात आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातून (Dharashiv Crime) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कसं चाललंय मित्रा म्हणून आवाज दिल्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या सध्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे मटणाच्या दुकानाशेजारी एक इसम बसला होता. यावेळी एका तरुणाने कसं चाललंय मित्रा म्हणून नाव घेत त्या इसमाला आवाज दिला. आपले नाव घेत आवाज दिल्याने इसमाला संताप अनावर झाला.
मटण कापण्याच्या सत्तुरने तरुणावर सपासप वार
यानंतर इसमाने मटण कापण्याच्या सत्तुरने तरुणावर सपासप वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा हात निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. हल्यानंतर तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. उपचारानंतर जखमी तरुणाचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या