Russia-Ukraine Conflict : युक्रेनमधील ओडेसावर रशियाकडून हल्ला होऊ शकतो : झेलेन्स्कींचा दावा
Russia-Ukraine Conflict : युक्रेनमधील काळ्या समुद्राच्या किनार्यावरील ऐतिहासिक बंदर शहर ओडेसावर रशियाकडून हल्ला होऊ शकतो, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केला आहे.
Russia-Ukraine Conflict : रशियन सैन्याने युक्रेनमधील काळ्या समुद्राच्या किनार्यावरील ऐतिहासिक बंदर शहर ओडेसावर हल्ला करण्याची तयारी केली आहे. असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केला आहे. झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, " रशियन सैन्य ओडेसामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत आहे.
"रशियन लोक कायम ओडेसामध्ये येत असतात. त्यांना नेहमीच येथे उबदारपणा आणि येथील प्रामाणिकपणा जाणवला आहे. परंतु, आता काय? ओडेसावर बॉम्बहल्ला? ओडेसाविरूद्ध तोफखाना? ओडेसाविरूद्ध क्षेपणास्त्रे? रशिया करत असलेले युद्ध हा एक ऐतिहासिक गुन्हा असेल." असे झेलेन्स्की यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
Zelensky (President of Ukraine) says Russian forces preparing to bombard Ukraine port city Odessa: AFP pic.twitter.com/jwhqSkBRr3
— ANI (@ANI) March 6, 2022
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. रशियन सैन्याने युक्रेनमधील उत्तर-पश्चिम आणि ईशान्येकडील राजधानी कीव्हच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर रशियाच्या दुसर्या गटाने खार्किव या उत्तरेकडील शहरावर बॉम्बहल्ला केला आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बहल्ला आणि गोळीबार करण्यात येत आहे.
दरम्यान, रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा व्होदिमर झेलेन्स्की यांनी शनिवारी केला होता. रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय रशियन सैन्याने युक्रेनचे दोन अणुप्रकल्प ताब्यात घेतले असून तिसरा प्रकल्प ताब्यात घेण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- Ukraine Russia War : रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त; व्होदिमर झेलेन्स्कींचा दावा
- Russia Ukraine War: Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल