Paytm Down Today: पेटीएम सर्व्हर डाऊन, डिजिटल पेमेंटच्या अडचणींमुळे यूजर्स नाराज, जाणून घ्या
Paytm Down Today: पेटीएम वरून डिजिटल पेमेंट करण्यात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
![Paytm Down Today: पेटीएम सर्व्हर डाऊन, डिजिटल पेमेंटच्या अडचणींमुळे यूजर्स नाराज, जाणून घ्या Paytm App Down Paytm Outages User Facing Problems Check Details marathi news Paytm Down Today: पेटीएम सर्व्हर डाऊन, डिजिटल पेमेंटच्या अडचणींमुळे यूजर्स नाराज, जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/1e6cb40f2a7645054b1ffc9210d8c9fd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Paytm Down Today: आज सकाळी देशभरात पेटीएम सेवा (Paytm Service) डाउन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पेटीएम वरून डिजिटल पेमेंट करण्यात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी पेटीएमला ट्विटरवर सांगितले की, त्यांचे खाते अॅपवरूनच लॉग आउट झाले आहे. पेटीएम सेवा बंद असल्याने आज सकाळपासूनच लोकांचे पैसे ट्रान्सफर होत नव्हते. यावर पेटीएमच्या वतीने ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.
We regret the inconvenience caused to our valued users this morning due to unprecedented external network issues. Thanks to our engineering teams' swift actions, we were able to get systems up again in a short time. We'd like to help you all individually. Pls read further (1/5)
— Paytm Money (@PaytmMoney) August 5, 2022
पेटीएमने स्पष्ट केले
काही वेळानंतर पेटीएम कंपनीच्या वतीने ट्विटरवर माहिती देण्यात आली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, अॅपमध्ये नेटवर्क त्रुटीमुळे अनेकांना लॉग इन करण्यात अडचण आली आणि अनेकांना पेमेंटही करता आले नाही.
Due to a network error across Paytm, a few of you might be facing an issue in logging into the Paytm Money App/website. We are already working on fixing the issue at the earliest. We will update you as soon as it is resolved
— Paytm Money (@PaytmMoney) August 5, 2022
लोकांना करावा लागला अडचणींचा सामना
याबाबत पेटीएम युजर्सचे म्हणणे आहे की, सध्या आम्हाला पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत, तसेच अॅपवरूनच खाते लॉग आउट करण्यात आले आहे. पेमेंट करताना सेशन टाइम आउट असे दिसत आहे.
संपूर्ण देशभरात सेवा बंद
माहितीनुसार, आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील याची पुष्टी केली आहे की, भारतभर पेटीएम युजर्सना अनेक समस्या येत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)