एक्स्प्लोर

लालू प्रसाद यादव यांच्या पाया पडल्या, राबडी देवींना साडी दिली; ममता बॅनर्जी म्हणाल्या...

Opposition Meeting in Patna: भाजपविरोधी रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची 23 जून रोजी पाटणामध्ये बैठक होणार आहे.

Opposition Meeting in Patna: भाजपविरोधी रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची 23 जून रोजी पाटणामध्ये बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाटणामध्ये सध्या बैठकीची तयारी सुरु आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधक या बैठकीत रणनिती ठरवणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी लालू प्रसाद यांच्या पाया पडल्या. तर, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना साडी भेट दिली आहे. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लालू प्रसाद यादव यांच्याशी माझे कौटुंबीक संबंध आहेत. मी लालू प्रसाद यांचा खूप सन्मान करते. राबडी देवी आणि लालू प्रसाद यांच्या भेटीनंतर मी आनंदी आहे. ते एक वरिष्ठ नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते तुरुंग आणि रुग्णालयात होते. लालू प्रसाद यादव यांची तब्येत एकदम ठीक असून, ते भाजपाच्या विरोधात लढू शकतात. 

"शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत काय होईल, हे आज सांगता येणार नाही. फक्त आम्ही एकत्र लढत जिंकू यावर उद्या शिक्कामोर्तब करण्यासाठी आलो आहोत. विरोधी पक्ष एका कुटुंबासारखे भाजपाविरोधात लढण्यासाठी पाटण्यात एकत्र येत आहेत," असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्याबरोबर अभिषेक बॅनर्जी सुद्धा होते. 

बिहार काँग्रसचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितलं की, "अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधात केंद्र सरकाराने काढलेल्या वटहुकूमाचा मुद्दा महत्वाचा नाही. यावर बैठकीत चर्चा होईलच. पण, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव कसा करता येईल. यावर चर्चा होणं गरजेचं आहे."

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील या बैठकीसाठी आज (22 जून) रोजी पाटणामध्ये दाखल होतील. या बैठकीमध्ये अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पाटणामध्ये होणारी बैठक ही सकारात्मक होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, देशाला संकटातून वाचवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरवावं लागणार आहे. 

बैठकीत 'हे' नेते होणार सहभागी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष - मल्लिकार्जून खर्गे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
आपचे प्रमुख - अरविंद केजरीवाल
डीएमकेचे प्रमुख - एमके स्टॅलिन 
झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख - हेमंत सोरेन
समाजवादी पक्षाचे प्रमुख - अखिलेश यादव
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख - उद्धव ठाकरे 
पीडीपी प्रमुख - महबूब मुफ्ती 
नॅशनल  कॉन्फरन्स प्रमुख - उमर अब्दुल्ला 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस - डी राजा
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस - सीताराम येचुरी 
भारत कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे सरचिटणीस - दीपांकर भट्टाचार्य 

आणखी वाचा :
Lok Sabha Elections 2024 : विरोधकांना धक्का, भाजपची पहिली मोहीम यशस्वी, 'एनडीए'ला मिळणार बळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget