एक्स्प्लोर
पतंजलीचं गायीचं दूध लॉन्च, दोन रुपयांनी स्वस्त मिळणार
पतंजलीने दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाच्या पुरवठ्यासाठी 56,000 किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे.
नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबांनी पतंजलीच्या उत्पादनामध्ये आणखी वाढ केली आहे. रामदेव बाबांनी आज (13 सप्टेंबर) गायीचं दूध आणि त्यापासून बनलेली उत्पादनं लॉन्च केली. गायीच्या दुधाचा दर 40 रुपये प्रति लिटर असेल. त्यामुळे बाजारात आधीपासूनच असेलल्या गायीच्या दुधापेक्षा हे दूध प्रति लिटर दोन रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये डेअरी प्रॉडक्ट्स लॉन्च करण्याआधी स्वत: रामदेव बाबांनी गायीचं दूध काढलं. पतंजलीने गायीच्या दुधासह दही, ताक आणि पनीरही लॉन्च केलं. पतंजली आधीपासूनच बाजारात गायीचं तूप विकत आहे.
पतंजलीने दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाच्या पुरवठ्यासाठी 56,000 किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे. यामधून 2019-2020 मध्ये दरदिवशी 10 लाख लिटर गायीच्या दुधाचा पुरवठा होईल, अशी आशा कंपनीला आहे. आम्ही पहिल्याच दिवशी चार लाख लिटर गायीच्या दुधाचं उत्पादन केलं आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. पतंजली लवकरच फ्लेवर्ड मिल्कही लॉन्च करणार आहे.
"गायीच्या दुधासाठी सुमारे एक लाख शेतकरी/पशुपालक आमच्यासोबत आहेत. पुढील वर्षी नव्या उत्पादनांच्या लॉन्चिंगमुळे सुमारे पाच लाख लोकांना रोजगार मिळेल," असा दावा कंपनीने केला आहे.
2020 पर्यंत या श्रेणीत सुमारे एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज पतंजलीला आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात दुग्धजन्य उत्पाजनांच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांच्या महसुलाचं लक्ष्य ठेवलं आहे.
आज लॉन्च केलेल्या उत्पादनांमध्ये 'दुग्ध अमृत' पशु आहार आणि बाटलीबंद पाणी 'दिव्य जल' याचाही समावेश आहे. पतंजलीने गायीचं दूध आणि दुग्धजन्य उत्पादनं टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याची योजना बनवली आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रात याच्या विक्रीची सुरुवात होणार आहे. इतर राज्यात हळूहळू विक्रीला सुरुवात होईल. आईसक्रीम आणि इतर डेअरी प्रॉडक्ट्सही बाजारात आणण्याची पतंजलीची योजना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement