एक्स्प्लोर

Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी बैठकीचं सत्र सुरु, शिवसेना सर्वपक्षीय बैठकीत मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उठवणार

केंद्र सरकारने सकाळी तर लोकसभा अध्यक्षांनी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा शिवसेना उपस्थित करणार आहे. 

नवी दिल्ली :  सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकीचं सत्र सुरु झालं असून सकाळी केंद्र सरकारच्या वतीनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तर संध्याकाळी चार वाजता लोकसभा अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना राज्यातील मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करून राज्यांना अधिकार देतानाच 50 टक्के मर्यादिबाबतही केंद्राने सवलत द्यावी ही मागणी करणार असल्याचं शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा एम्पिरिकल डेटा केंद्राने तातडीने द्यावा यासाठीही मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरही लक्ष वेधणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दुसरीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संध्याकाळी सहा वाजता काँग्रेस खासदारांची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. 

त्या आधी राज्यसभा सभापती वैंकया नायडू यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून म्हणजे 19 जुलैपासून सुरुवात होत आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची या अधिवेशनातली ही पहिलीच परीक्षा असणार आहे. सात महिन्यांपासूनही तोडगा न निघालेलं शेतकरी आंदोलन, कोरोनाच्या दुसरा लाटेतला कहर आणि तिसऱ्या लाटेची भीती, बंगालच्या निकालानंतर विरोधकांमध्ये वाढलेला आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 

पावसाळी अधिवेशन19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे गेल्या अधिवेशनात संसदेची दोन्ही सभागृहं दोन शिफ्टमध्ये चालवावी लागली होती. यावेळी मात्र दोन्ही सभागृहं एकाचवेळी  सकाळी 11 ते 6 या वेळेत चालणार आहेत. ज्या खासदारांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांना आरटीपीसीआर टेस्टची गरज उरलेली नाही.  या अधिवेशनात एकूण 23 विधेयकं सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी 6 जुनी तर 17 नवी विधेयकं आहेत.

कुठली महत्वाची विधेयकं अधिवेशनात येणार?

  • डीएनए तंत्रज्ञान वापर नियमन विधेयक- डीएनए तंत्रज्ञानाचा वापर केवळ ठराविकच पद्धतीनं करता यावा, त्यातले गैरप्रकार टाळण्यासाठी विधेयक
  • पेन्शन फंडसंदर्भात सरकारनं बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या त्यानुसार एनपीएस ट्रस्ट पेन्शन फंडापासून वेगळं करणारं विधेयक
  • सामान्य लोकांच्या बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण देणारं ठेव विमा दुरुस्ती विधेयक
  • वीजेच्या वितरणात खासगी कंपन्यांनाही अधिक मुभा देणारं वीज वितरण दुरुस्ती विधेयक 

या महत्वाच्या विधेयकांसह एकूण 23 विधेयकं अधिवेशनात मांडली जाणार आहेत.  क्रिप्टो करन्सीला प्रतिबंधित करणा-या विधेयकाचीही खूप चर्चा होती, पण हे विधेयक तूर्तास मांडलं जाणार नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue : यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
Telly Masala : पुण्यात दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; पाहा व्हिडीओ ते 'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
पुण्यात दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; पाहा व्हिडीओ ते 'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Narayan Rane: आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचं असतं तर एकही घरापर्यंत पोचू शकला नसता: नारायण राणे
तर एकही घरापर्यंत पोहोचू शकला नसता, राड्यानंतर नारायण राणेंची पत्रकार परिषद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane Rajkot Rada :  घरात खेचून एकेकाला रात्रभर मारुन टाकीन, सोडणार नाही : नारायण राणेAaditya Thackeray Speech Malvan : पुतळा, राजकारण, राडा, घोषणा; आदित्य ठाकरेंचं भर पावसात तुफान भाषणMVA Full PC on Malvan Statue Collapse : महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला ; मविआची संपूर्ण PCMalvan Rajkot Rada : धक्काबुक्की, दमदाटी, पेंग्विन ते कोंबडी चोर;राजकोट गडावर राडा, नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue : यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
Telly Masala : पुण्यात दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; पाहा व्हिडीओ ते 'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
पुण्यात दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; पाहा व्हिडीओ ते 'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Narayan Rane: आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचं असतं तर एकही घरापर्यंत पोचू शकला नसता: नारायण राणे
तर एकही घरापर्यंत पोहोचू शकला नसता, राड्यानंतर नारायण राणेंची पत्रकार परिषद
Thackeray Faction Vs BJP Controversy At Rajkot Fort : अंगार, भंगार, पेंग्विन ते कोंबड्या आणल्या नाहीत; शिवरायांच्या 'राजकोट'वर कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली
अंगार, भंगार, पेंग्विन ते कोंबड्या आणल्या नाहीत; शिवरायांच्या 'राजकोट'वर कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली
Marathi Natak Suryachi Pille :  'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर,  रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार शुभारंभाचा प्रयोग
'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर, रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार शुभारंभाचा प्रयोग
Gold Silver Rate: मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना संधी, जाणून घ्या कोणत्या शहरात दर? 
Gold Silver Rate: मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना संधी, जाणून घ्या कोणत्या शहरात दर? 
Tikdam Movie Review : तिकडम चित्रपट रिव्ह्यू; अमित सियालचा दमदार अभिनय
तिकडम चित्रपट रिव्ह्यू; अमित सियालचा दमदार अभिनय
Embed widget