Ludhiana Court Blast : लुधियाना कोर्टातील स्फोटाचं पाकिस्तान कनेक्शन; मुंबईत साखळी स्फोटाचा होता कट, तपासात आणखी एक षडयंत्र उघड
Ludhiana Court Blast : लुधियाना कोर्टातील स्फोटाचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. मुंबईत साखळी स्फोटाचा कट होता, असं चौकशीतून समजलं आहे.

Ludhiana Court Blast : मुंबईत साखळी स्फोट घडवून अस्थिरता माजवण्याचं षडयंत्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. पाकिस्तानात हा कट शिजत असल्याची माहिती पंजाबमधल्या लुधियाना कोर्टात झालेल्या स्फोटाच्या तपासात समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी केलेल्या तपासात लुधियाना स्फोटाचं आयएसआय कनेक्शनही उघड झालं आहे. त्यातच मुंबईसह दिल्लीत साखळी स्फोट घडवण्याचा कटही उघड झाला आहे. जर्मनीमधून जसविंदर सिंह मुलतानी याला ताब्यात घेतल्यानंतर पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे.
मुंबईसह देशात काही ठिकाणी साखळी स्फोट घडवण्याचं षडयंत्र पाकिस्तानात शिजतंय आणि त्यात मूळ मुंबईच्या असलेल्या गँगस्टर हरविंदर सिंग रिंदा याचा सहभाग असल्याची माहिती समोर येतेय. कोण आहे हा मुंबईचा नवा दुश्मन पाहुयात...
कोण आहे मुंबईचा वैरी?
- मुंबईसह देशात साखळी बॉम्बस्फोट करण्याचं पाकिस्तानात षडयंत्र
- आयएसआयच्या षडयंत्रात हरविंदर सिंह रिंदा याचा सहभाग
- हरविंदर सिंह रिंदा मूळचा मुंबईतील गँगस्टर
- हरविंदर सिंहचं सध्या पाकिस्तानात लाहोरमध्ये वास्तव्य
- हरविंदर सिंह विरोधात चंदीगडमध्येही अनेक गुन्हे दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

