एक्स्प्लोर

Sanjay Raut : फडणवीसांकडून शिंदेंच्या 'मित्रा'ची उचलबांगडी, संजय राऊत म्हणाले, 'त्याचे राजकीय आका...'

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था (मित्र) या आयोगाच्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय अशर (Ajay Asher) यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा निर्णय घेत अजय अशर यांना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात असून यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजय अशरवर निशाणा साधलाय. 

याबाबत संजय राऊत म्हणाले की, या उद्योजकांच्या समितीवर प्रवीण परदेशी यांची नेमणूक होणे याचे आम्ही स्वागत करतो. अजय अशय हा ठाण्यातला बिल्डर होता. त्याचे उद्योग सर्वांना माहिती आहे. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणे, जमिनीचे व्यवहार करणारे आणि त्यांच्या पैशाचे संरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेना तीन वर्षांपूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला. आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पैशांची देवाण-घेवाण करण्यामध्ये अजय अशर होता. अजय अशर, भाजपचे खासदार सुरतचे खासदार आणि मुंबईतले काही ठेकेदार या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता.  अजय अशरने मधल्या काळात हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी देश सोडला आहे. त्याने देशातून पलायन केले आहे. नीरव मोदी, विजय माल्या असे अनेक लोक पाळले आहेत. आता अजय अशर पळाला, असे त्यांनी म्हटले.  

त्याचे राजकीय आका ईडीची फिट केस

कोणीतरी राणा नावाचा अतिरेकी आहे. त्याला परत आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत. त्यांना परत कधी आणणार? अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे आणि किती पैसा गोळा केला? किमान दहा हजार कोटी रुपये घेऊन हे महाशय परदेशात स्थायिक व्हायला गेले आहेत. त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधील अनेकांनी पैसे गुंतवले आहे. जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल, अशा व्यक्तीला मित्र या संघटनेतून दूर करावे, आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावे, तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले. अजय अशर आणि त्याचे राजकीय आका ईडीची फिट केस आहे. पण ईडी यांच्याकडे पोहोचणार आहे का? गृहमंत्रालयाने अजय अशरला विविध गुन्हे दाखल करून त्याची झडती घेऊन चौकशी केली पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला 

एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. ते फक्त उड्या मारायचे. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो. अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही.त्यामुळे त्यांचे पंख छाटले जात आहेत हे मला मान्य नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.   

आणखी वाचा 

बेरोजगार तरुणांऐवजी चक्क कर्मचार्‍यांच्या खात्यावर पैसे जमा, महायुती सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठा घोटाळा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
Mhasla Nagarpanchayat : रायगडच्या राजकारणात खळबळ! चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा; शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?
चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा; शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?
शिवसेनेच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकीय वातावरण तापलं, गुन्हा दाखल  
शिवसेनेच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकीय वातावरण तापलं, गुन्हा दाखल  
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
Embed widget