लष्करी एअरबेसला भेट, शिष्टमंडळाची बांधणी, चॅनलबंदी..पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताचं सगळंच कॉपी केलं
पंतप्रधान मोदींप्रमाणेच आता शाहबाज शरीफ यांनी त्यांचे लष्करी दौरे सुरू केले आहेत .या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले .

Operation SIndoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरने जागतिक स्तरावर पाकिस्तानला अपमानित केले आहे .संपूर्ण जगाने पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा पाहिला आहे .आता भारत सरकारने खासदारांच्या नेतृत्वाखाली साथ शिफ्टमंडळी स्थापन केले आहे जे परदेशात जाऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करतील . खासदार आणि मंत्र्यांव्यतिरिक्त माजी राजदूतांचाही या शिष्टमंडळात समावेश असेल . आता यातही पाकिस्तानने भारताची नक्कल केली आहे .पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे .जी परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानची बाजू मांडेल . (India vs Pakistan)
पाकिस्तानने बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली असून त्यात माजी मंत्री खुर्रम दस्तगीर खान , हिना रब्बानी खार आणि माझी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांचा समावेश आहे .बिलावल भुट्टो यांनी एका x पोस्टमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मला जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचे बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे . ही जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे .असं त्यांनी म्हटलं .
पाकिस्तानकडून भारताचे अनुकरण
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर एयरबेस वर पोहोचले होते .भारतीय हवाई दलाच्या सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी लष्कराचे मनोबल वाढवलं .त्यावेळी त्यांनी पाकिस्तानने सांगितलेले खोटे दावे ही उघड केले होते . दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ हे पंतप्रधान मोदींचे अनुकरण करताना दिसत असून पंतप्रधान मोदींप्रमाणेच आता शाहबाज शरीफ यांनी त्यांचे लष्करी दौरे सुरू केले आहेत .या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले .पाकिस्तानने सियालकोटमधील पसरूर छावणीला भेट दिल्याचा दावा केलाय .पाकिस्तानी सैन्याला ते भेटले आहेत . भारताच्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकींची नक्कल पाकिस्तान करत असून पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठका बोलावल्या आहेत . ऑपरेशनची पद्धत वेळ आणि लक्ष ठरवण्यासाठी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानाची ही शाहबाज शरीफ यांनी नक्कल केल्याचे यावेळी दिसून आले .
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे .पाकिस्तानच्या खोटेपणाने प्रचाराचा प्रसार थांबवण्यासाठी भारताने पाकिस्तानातील प्रमुख पाकिस्तानी मीडिया प्लॅटफॉर्म सह 16 youtube चैनल वर ही बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय .याचीही पाकिस्तानकडून नक्कल झाली आहे .पाकिस्तानी भारताच्या 32 वेबसाईटवर बंदी घातली आहे .
हेही वाचा:























