एक्स्प्लोर

Pakistan News : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच! कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा प्लॅन; काय आहे प्रकरण?

Pakistan News : पाकिस्तान भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या दहशतवाद्यांच्या नेटवर्कला पुन्हा उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. पाक सरकारने दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

Pakistan News : 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) दरम्यान भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan) चोख प्रत्युत्तर देत नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आणि ही सर्व ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त केली. भारताच्या या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या (Masood Azhar) कुटुंबातील 14 जण ठार झाल्याची माहिती आहे.

मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या दहशतवादी नेटवर्कला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान सरकार मसूद अझहरला देखील 14 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची शक्यता आहे.

पाक सरकारकडून नुकसानभरपाई पॅकेजला मंजुरी

भारताच्या हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना (कायदेशीर वारसदार म्हणून) 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई पॅकेजला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. आता जर मसूद अझहर हा आपल्या कुटुंबातील मृत 14 जणांचा एकमेव कायदेशीर वारसदार असेल, तर त्याला एकूण 14 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

भारताच्या हल्ल्यात JeM चे मुख्यालय उद्ध्वस्त

भारतीय लष्कराने 07 मे रोजी लाहोरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलपूर येथील एका दहशतवादी छावणीवर निशाणा साधून हल्ला केला, जे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. पाकिस्तानी माध्यमांनी मसूद अझहरच्या हवाल्याने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण, मेहुणा, एक भाचा आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचा आणि दहशतवाद्यांचे तळ पुन्हा उभे करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतासह जगातील अनेक देशांसाठी धक्कादायक असून, त्यामुळे सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तानकडे एवढे पैसे कुठून येणार?

आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानकडे एवढे पैसे येणार कुठून? आता सवाल उपस्थित होत आहे. पाकिस्तान सरकारकडे हे पैसे सामान्य नागरिकांकडून गोळा केलेल्या करांच्या माध्यमातून उभे केले जातील. याशिवाय, 7 अब्ज डॉलर्सच्या एक्सटेंडेड फंड स्कीम (EFF) अंतर्गत पाकिस्तानला आत्तापर्यंत IMF कडून एकूण 2.1 अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. यासोबतच, क्लायमेट रेजिलिएन्स लोन प्रोग्रॅम अंतर्गत पाकिस्तानला 1.4 बिलियन डॉलर्स (सुमारे 12 हजार कोटी रुपये) चे नवीन कर्जही मंजूर झाले आहे. पाकिस्तान हे पैसे खरंच आपल्या देशातील जनतेसाठी आणि कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वापरणार की हे पैसे दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत? याकडे आता   संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’चा नवा व्हिडीओ भारतीय लष्कराकडून जारी 

दरम्यान, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित आणखी एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लष्कराचे जवान दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. इंडियन आर्मीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे – “प्लॅनिंग केली, ट्रेनिंग घेतली आणि कारवाई केली. न्याय झाला.”  

भारतीय सैन्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले, “याची सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून झाली. राग नव्हता, ते ज्वालामुखी होते. मनात एकच विचार होता की, यावेळी असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्यांना लक्षात राहील. हा बदला नव्हता, हा न्याय होता. 9  मे रोजी रात्री सुमारे 9 वाजता ज्या कोणत्याही शत्रूच्या पोस्टने सीजफायरचे उल्लंघन केले, त्या सर्व पोस्ट भारतीय लष्कराने जमीनदोस्त केल्या. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक कारवाई नव्हती, तर पाकिस्तानसाठी तो धडा होता, जो त्याने शिकलेला नव्हता,” असे म्हटले आहे. 

आणखी वाचा 

पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Mumbai Crime News: दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार
दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Priyadarshini Indalkar On Love And Marriage: 'आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय, पुढच्या पिढीचं काय होणार?'; प्रेमाबद्दल प्रियदर्शिनी इंदलकरनं मांडलं भयाण वास्तव
'आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय, पुढच्या पिढीचं काय होणार?'; प्रेमाबद्दल प्रियदर्शिनी इंदलकरनं मांडलं भयाण वास्तव
Maharashtra Live Blog Updates: नाशिक महापालिकेच्या महापौर–उपमहापौर पदासाठी आज निवडणूक
Maharashtra Live Blog Updates: नाशिक महापालिकेच्या महापौर–उपमहापौर पदासाठी आज निवडणूक
Embed widget