एक्स्प्लोर

खोलीत केवळ 5 जणांनाच एण्ट्री, जयललितांना नेमका आजार काय?

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या जयललिता यांची प्रकृती खरं तर सुधारली होती. कोणत्याही क्षणी त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार होती. पण त्याआधीच जयललिता यांना काल हृदयविकाराचा झटका आला. एम्सचे डॉक्टर तामिळनाडूत सध्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची देखभाल सुरु आहे. मदतीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डॉक्टरही तामिळनाडूत दाखल झाले आहेत. तर सल्ला घेण्यासाठी लंडनच्या डॉक्टरांशीही संपर्क करण्यात आला आहे. दरम्यान अपोलो रुग्णालयातच काल रात्री तामिळनाडू मंत्रिमंडळाची आपात्कालीन बैठकही पार पडली. समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी रातोरात पसरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रुग्णालाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक समर्थकांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. तर अनेकांनी रात्रभर रुग्णालाबाहेर ठाण मांडलं. दरम्यान, गर्दीमुळे काही गालबोट लागू नये, म्हणून रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. नेमका आजार काय? 22 सप्टेंबरला रात्री 9.45 वाजता अचानक जयललिता मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानातून अपोलो हॉस्पिटलला याबाबत कळवण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयाने तातडीने अॅम्ब्युलन्स पाठवली, मात्र नेमकं आजारी कोण आहे, याबाबतची माहिती दिली नव्हती. अचानक अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला मुख्यमंत्री निवासस्थानाकडे पोहोचण्यास सांगितलं. त्यानंतर अर्ध्या तासाभरात जयललिता बेशुद्ध अवस्थेत ग्रीम्स रोडवरील अपोलो रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र त्यांना नेमका आजार काय हे कोणीच सांगितलं नाही. माझ्या जीवाला धोका : डॉक्टर जयललितांच्या आजाराबाबत नेमकी माहिती देण्यास इथले डॉक्टर वा अन्य कर्मचारी नकार देत आहेत.  अपोलो हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या फोनवर सुरक्षा रक्षकांची नजर आहे. जयललितांच्या प्रकृतीबाबत इतकी गोपनियता बाळगण्यात आली आहे की, त्यांची मेडिकल फाईल उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3-4 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं. तसंच जयललितांच्या प्रकृतीबाबत बोलणाऱ्या एका डॉक्टरला धमक्याही आल्याचं त्या डॉक्टरांनी सांगितलं. 23 ऑक्टोबरपर्यंत 43 जणांवर मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. केवळ पाच जणांनाच जयललितांच्या रुममध्ये एण्ट्री जयललिता यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत सावधपणे सर्व हालचाली करण्यात येत आहेत. रुग्णालयात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केवळ पाच जणांनाच जयललिता अॅडमिट असलेल्या रुममध्ये एण्ट्री आहे. यामध्ये जयललितांच्या जवळच्या सहकारी शशिकलांचाही समावेश आहे. शशिकला जयललितांच्या घरीच राहतात. याशिवाय जयललितांचे फॅमिली डॉक्टर शिवकुमार, राज्यपाल आणि अन्य दोघांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी तीन डॉक्टर पाठवले प्रकृती अस्वास्थामुळे जयललितांवर गेल्या तीन-चार महिन्यापासून उपचार सुरु आहेत. जयललिता नियमितपणे तपासणीसाठी चेन्नईच्या श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेजमध्ये जात होत्या. त्याबाबतची माहिती कोणालाही दिली नव्हती. त्यानंतर 23 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयललितांच्या उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालायतील तीन डॉक्टर चेन्नईला पाठवले होते. यामध्ये कार्डियोलॉजिस्ट नितीश नाईक, पल्मोनोरोलॉजिस्ट जीसी खिलनानी आणि भूलतज्ज्ञ अंजन त्रिखा यांचा समावेश होता. या दरम्यान जयललितांना हृदयविक्राराचा सौम्य झटका आला होता. त्यातच त्यांच्या शरिरातील साखरेचं प्रमाण अर्थात शुगर वाढली. तसंच ब्लडप्रेशर अनियंत्रित होता. मग त्यांना अन्य अवयवांचाही त्रास होऊ लागला. किडनी, यकृत (लिव्हर) आणि फुप्फुसामध्येही संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना 28 तारखेपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. संबंधित बातम्या
जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती चिंताजनक
हॉस्पिटलबाहेर जयललिता समर्थकांचं ठाण, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जयललिता यांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून दोषमुक्त, पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा 
जयललितांच्या चाहत्याने स्वत:ला येशूप्रमाणे हातात खिळे ठोकून क्रॉसवर लटकवलं
जयललितांचा उल्लेख ‘दोषी’ असा केल्याने सभागृहातून आमदारांचं निलंबन
जयललितांना 10 वर्षे निवडणूक लढवता योणार नाही!
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना जामीन मंजूर 
जयललितांना शिक्षा झाल्याने तामिळनाडूत 16 जणांचा मृत्यू  
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना ओ. पनीरसेल्वम ढसासढसा रडले  
जयललिता…कैदी नंबर 7402, मु.पो. बंगलोर कारागृह!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना चार वर्षाचा कारावास, जयललितांनी मुख्यमंत्रीपद गमावलं 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
Parli Crime : परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Dhurandhar Record In Pakistan: देशविरोधी सिनेमा असूनही पाकिस्तानात 'धुरंधर'चं तुफान; बंदीमुळे रिलीज झाला नाही, तर पायरेटेड कॉपी डाऊनलोड करण्याचा वाढला ट्रेंड
देशविरोधी सिनेमा असूनही पाकिस्तानात 'धुरंधर'चं तुफान; 20 वर्षांतली सर्वाधिक पाहिली गेलेली 'पायरेटेड बॉलिवूड फिल्म'
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Manikrao Kokate: नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालयात पाऊल ठेवताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती आणखी बिघडली? अँजिओग्राफी होण्याची शक्यता
नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालयात पाऊल ठेवताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती आणखी बिघडली? अँजिओग्राफी होण्याची शक्यता
Embed widget