Omicron : भारताला ओमायक्रॉनचा विळखा, 26 राज्यांमध्ये 3 हजाराहून अधिक ओमायक्रॉनबाधित
Omicron Virus in India : देशात ओमायक्रॉन व्हेरियंट 26 राज्यांमध्ये पसरला आहे. भारतातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढून 3 हजारांच्या पार पोहोचली आहे.
Omicron Variant in India : देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोघांवत असताना कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच देशात ओमायक्रॉन व्हेरियंट 26 राज्यांमध्ये पसरला आहे. भारतातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढून 3 हजारांच्या पार पोहोचली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 465 रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 79 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये सर्वात जास्त 57 रुग्ण सापडले आहेत. तर, ठाण्यात 7, नागपूरमध्ये 6, पुणे शहरात 5. पुणे ग्रामीणमधअये 3 आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
इतर राज्यांमधील ओमायक्रॉनची परिस्थिती
दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे 465 रुग्ण आढळले आहेत. तर, राजस्थानात 291, केरळमध्ये 284, कर्नाटकमध्ये 333, गुजरातमध्ये 204, तमिळनाडूत 121, तेलंगाणात 94, हरयाणामध्ये 71, ओदिशात 60, उत्तर प्रदेशमध्ये 31, आंध्र प्रदेशात 28, पश्चिम बंगालमध्ये 20 आणि मध्य प्रदेशात ओमायक्रॉनच्या नऊ रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढताना दिसत आहे. आता देशात या व्हेरियंटनं दुसरा मृत्यू झाला आहे. ओदिशातील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमायक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 73 वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus in India : देशात कोरोनाचा विस्फोट, मागील 24 तासांत 1 लाख 16 हजार 390 नवे रुग्ण
- Truth Social App : ट्रम्प यांचा आणखी एक उद्योग, फेब्रुवारी महिन्यात येणार ट्विटरला टक्कर देणारा अॅप
- आमिर अली आणि संजीदा शेखचा घटस्फोट, लग्नाच्या 9 वर्षानंतर विभक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha