India-Bangladesh Love Story : प्रेमासाठी काय पण! बांगलादेशातून पोहत भारतात पोहोचली, लग्न केल्यानंतर पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या प्रकरण
India-Bangladesh Love Story : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे लग्नात रूपांतर करण्यासाठी बांगलादेशातून मुलगी थेट भारतात आली.
India-Bangladesh Love Story : प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं. आणि ते माणसाला त्याच्या मर्यादा ओलांडण्यास भाग पाडतं. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला. बांगलादेशातील कृष्णा मंडल या 22 वर्षाच्या मुलीने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट भारत गाठले. फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे लग्नात रूपांतर करण्यासाठी ही मुलगी थेट बांगलादेशातून भारतात आली. पण ही मुलगी ना ट्रेन, ना विमान, ना कोणत्या गाडीने आली तर ही मुलगी चक्क सुंदरबनच्या जंगलातून मार्ग काढत नहीच्या पाण्यात पोहत तिने भारत गाठला. सुंदरबनचे जंगल 10 हजार चौरस किमी क्षेत्रफळात आहे, जे भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पसरलेले आहे. यापैकी सुमारे 60 टक्के बांगलादेशात आणि 40 टक्के भारताच्या पश्चिम बंगालमध्ये आहे.
कृष्णा मंडलने भारतातील रहिवासी असलेल्या आशिक मंडलशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली होती. त्यानंतर त्यांचे प्रेम इतके वाढले की, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाकडे पासपोर्ट नसल्याने ती बांगलादेशातून भारतात येऊ शकली नाही. अशा परिस्थितीत तिने सुंदरबन डेल्टा पोहून भारतात येण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी घेतलं ताब्यात
कृष्णा मंडलचे लग्न झाले. पण, नंतर पोलिसांना ही बातमी मिळताच असे लक्षात आले की, कृष्णा केवळ पासपोर्टशिवाय भारतातच पोहोचली नाही, तर कोलकाता येथील मंदिरात तिच्या प्रियकराशी तिने लग्नही केले. मात्र, कृष्णा पासपोर्टशिवाय भारतात आल्याची बातमी पोलिसांना मिळताच तिला अटक करण्यात आली.
पत्नीच्या अटकेने पती दु:खी
संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कृष्णाकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळेच तिला बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र, या प्रकरणानंतर कृष्णाचा पती आशिक मंडल चांगलाच खचला आहे.
महत्वाच्या बातम्या :