(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Odisha Minister Naba Das : ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार, प्रकृती गंभीर; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
ओडिशाचे (Odisha) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री (Odisha health and family welfare minister) आणि ज्येष्ठ बिजू जनता दल (बीजेडी) नेते नबा दास यांच्यावर पोलिसाने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.
Odisha Minister Naba Das : ओडिशाचे (Odisha) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री (Odisha health and family welfare minister) आणि ज्येष्ठ बिजू जनता दल (बीजेडी) नेते नबा दास (Biju Janata Dal (BJD) leader Naba Das) यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
Odisha Health Minister Naba Das brought to a local hospital after being shot at by some unidentified assailants near Brajarajnagar in Jharsuguda district.
— ANI (@ANI) January 29, 2023
Details awaited pic.twitter.com/jUkyjWZwm4
60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दास यांनी त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले की, नबा दास यांच्या छातीवर डाव्या बाजूला गोळ्या लागल्या आहेत. एएसआयच्या रिव्हॉल्व्हरमधून काही गोळ्या लागल्याने शेजारी असलेला एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. एएसआयने मंत्र्यांवर गोळीबार का केला? हे जाणून घेण्यासाठी आम्ही एएसआयची चौकशी करत असल्याचेही भोई यांनी सांगितले.
Bhubaneswar | Odisha CM Naveen Patnaik condemns the attack on State Health Minister Naba Das.
— ANI (@ANI) January 29, 2023
He visited him at the private hospital where he is under medical treatment
CM has directed Crime Branch to take up the investigation in the case. pic.twitter.com/74lrwrP1Qo
या घटनेनंतर दास यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पुढील उपचारासाठी नबा दास यांना एअरलिफ्ट करून भुवनेश्वरला हलवण्यात आलं आहे. तीनवेळा आमदार राहिलेले नबा दास या महिन्यात त्रिवेणी अमावस्येच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील शनि शिंणापूर मंदिराला 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचा 1.7 किलो सोने आणि 5 किलो चांदीचा कलश दान केल्यानंतर चर्चेत आले होते. नवीन पटनायक मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांनंतर ते प्रभावशाली नेते असून दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.
आठवडाभरापूर्वीच एक कोटी रुपयांचा सोन्याचा आणि चांदीचा कलश दान
मंत्री नबा किशोर दास यांनी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील शनी मंदिर ट्रस्टला एक कोटी रुपयांचा सोन्याचा आणि चांदीचा कलश दान केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध शनी मंदिरात कलश म्हणून वापरण्यात येणारा घागर बनवण्यासाठी 700 ग्रॅम सोने आणि 5 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. दास यांनी दान केलेले कलश हे शनी मंदिराला दिलेले आतापर्यंतचे सर्वात महागडे दान आहे. दास आपल्या कुटुंबीयांसह मंदिरात पोहोचले आणि मंत्रोच्चार करत कलश दान केले होते. आनंद भलगट नावाच्या एका कारागिराने हा कलश बनवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या