एक्स्प्लोर

Mann Ki Baat Highlights : ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, मन की बातमधून पंतप्रधानांनी सांगितलं तृणधान्याचं महत्त्व 

Mann ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मन की बातच्या (Mann ki Baat) माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मन की बातच्या (Mann ki Baat) माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. 2023 या नवीन वर्षातील मन की बातचा हा पहिलाच भाग होता. पंतप्रधानांनी आज तृणधान्याचे महत्व सांगितले. ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी चांगली असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान मोदी यांनी पद्म पुरस्कार मिळालेल्या सर्वांचं अभिनंदन केलं.

पंतप्रधान मोदी यांच्या  मन की बात या कार्यक्रमाचा हा 97 वा भाग होता. मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान अनेकदा लोकांना प्रेरणादायी गोष्टी सांगत असतात. यावर्षी आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित लोकांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे. त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. एवढ्या सगळ्यात आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतो असेही पंतप्रधान म्हणाले. जगाला तृणधान्याचे महत्व समजल्यामुळं शेतकरी खुश आहेत. तृणधान्य बाजाराच आणण्याचे काम उद्योजकांनी केलं आहे.  

अलिबागच्या शर्मीला ओसवाल यांच्या कामाचे पंतप्रधानांनी केलं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अलिबागमधील केनाड गावच्या शर्मीला ओसवाल यांचेही मन की बात मध्ये कौतुक केलं. शर्मीला ओसवाल या गेल्या 20 वर्षापासून तृणधान्याचे उत्पादन घेत आहेत. तसेच शेतकऱ्यांना त्या मार्गदर्शनही देत आहेत. तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न त्या करत आहेत.

योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष

भारताच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. योग आणि बाजरी  आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.  हे दोन्ही घटक आपल्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असेही पंतप्रधान म्हणाले. यामध्ये लोकांचा सहभाग वाढत आहे, त्यामुळं देश नवीन क्रांतीच्या मार्गावर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आपला देश लोकशाहीची जननी

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. आपला देश लोकशाहीची जननी आहे. याचा आम्हा भारतीयांना अभिमान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. लोकशाही आपल्या रक्तात आहे, आपल्या संस्कृतीत आहे. शतकानुशतके आपल्या कार्याचा तो अविभाज्य भाग आहे. आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत असंही मोदी म्हणाले.

Purple Fest 2023 गोवा पर्पल फेस्ट कार्यक्रमाचा उल्लेख 

गोव्यात पर्पल फेस्टचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये उल्लेख केला. दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा एक अनोखा प्रयत्न होता. यामध्ये 50 हजारांहून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले होते याचा आनंद झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना? नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार, गुजरातमधल्या 'त्या' पहिल्या भेटीचा किस्सा काय? 

महत्त्वाच्या बातम्या

Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget