एक्स्प्लोर

सीबीआय वाद : अंतिम सुनावणी नाहीच, वर्मांवरील आरोपांवर बुधवारी सुनावणी

तब्बल चार तास चाललेल्या सुनावणीत आलोक वर्मांना सुट्टीवर पाठवण्याचे आदेश कायदेशीर योग्य आहेत की नाहीत यावर युक्तीवाद झाला.

नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. तब्बल चार तास चाललेल्या सुनावणीत आलोक वर्मांना सुट्टीवर पाठवण्याचे आदेश कायदेशीर योग्य आहेत की नाहीत यावर युक्तीवाद झाला. केंद्रीय दक्षता आयोगाच्या रिपोर्टमध्ये आलोक वर्मा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर बुधवारी सुनावणी होणार आहे. काय आहे प्रकरण? सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश आस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यामुळे या दोघांना सुट्टीवर पाठवण्यात आले होते. यावर वेगवेगळ्या याचिकांवर कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामुळे देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयचा कारभार चव्हाट्यावर आला होता. काय झाले आज? सीबीआयचे संचालक आलोक वर्माचे वकील फली नरिमन यांनी आपली बाजू सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मांडली. सरकार किंवा केंद्रीय दक्षता आयोग सीबीआयच्या संचालकांना असं सुट्टीवर पाठवू शकत नाही, असा युक्तीवाद फली नरिमन यांनी केला. सीबीआय संचालकांकडे 2 दोन वर्षाचा कालावधी असतो. त्यापूर्वी त्यांची बदली करु शकत नाही. मात्र या प्रकरणात नियुक्ती पॅनलला सूचना न देता सुट्टीवर पाठवण्यात आले. यामागे एकच हेतू आहे, ते म्हणजे काम करु न देणे, असं फली नरिमन म्हणाले. न्यायालयाचा प्रतिप्रश्न वर्मांचे वकील फली नरिमन यांच्या युक्तीवादावर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने नरिमन यांना प्रतिप्रश्न केला. सीबीआयचे अधिकारी जर लाच घेताना रंगेहात पकडला गेला, तरी त्याला हटवण्यासाठी कमिटीला विचारावे लागेल का? असा प्रतिप्रश्न न्यायधीश जोसेफ यांनी केला. आलोक वर्मा यांच्या वकीलाच्या युक्तीवादानंतर एनजीओ कॉमन कॉजचे वकील दुष्यंच दवे, मल्लिकार्जुन खरगे यांचे वकील कपिल सिब्बल आणि बदली केलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांचे वकील राजीव धवन यांचेही युक्तीवाद झाले. सर्वांनी संचालकांना सुट्टीवर पाठवणे अयोग्य असल्याचे म्हटले. कपिल सिब्बल याचं उत्तर न्यायाधीश जोसेफ यांच्या प्रश्नाचे उत्तर कपिल सिब्बल यांनी दिले. सीबीआयचे संचालक लाच घेताना पकडले गेले तरी निवड समितीची मंजूरी घेणे गरजेचे आहे. कोणतीही स्थिती असली तरी निवड समितीची मंजूरी गरजेची आहे, असे स्पष्टीकरण कपिल सिब्बल यांनी दिले. या संवेदनशील पदांना अशी सुरक्ष व्यवस्था यामुळे दिली गेली आहे, कारण कोणत्याही दबावात अधिकाऱ्यांनी काम करु नये, असंही सिब्बल म्हणाले. तसेच सीवीसी फक्त भ्रष्टाचारसंबधी प्रकरणावर देखरेखीसाठी असते. सीबीआयच्या प्रत्येक कामात सीवीसी ढवळाढवळ करु शकत नाही, असेही सिब्बल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी 29 ऑक्टोबरला ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Nagpur MLC Election Result 2026: नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Embed widget