एक्स्प्लोर
नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.
पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला.
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सीबीआयने केलेल्या छापेमारीनंतर, लालू आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध ताणले होते. त्याचा शेवट आज नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाल्याचं सध्यातरी पाहायला मिळतं.
नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
“बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली.
राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?
जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) :
- आरजेडी (लालू) – 80
- जेडीयू (नितीश कुमार) – 71
- काँग्रेस – 27
- भाजप – 53
- सीपीआय – 3
- लोक जनशक्ती पार्टी – 2
- राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
- अपक्ष – 4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement