एक्स्प्लोर

धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका, मराठमोळ्या प्रथमेश शिंदेविरोधात जम्मू काश्मीरमध्ये गुन्हा, श्रीनगर NIT मधून निलंबन

श्रीनगर एनआयटीमध्ये या विद्यार्थ्याविरोधात निदर्शनं करण्यात आली असल्याचीही माहिती मिळत आहे. या निदर्शनांनंतर काही विद्यार्थ्यांनी प्रथमेश शिंदेंविरोधात तक्रार दाखल केली.

FIR Registered on NIT Srinagar Student: श्रीनगर: धार्मिक भावना भडकवणारा व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) श्रीनगर एनआयटीमधील (Srinagar NIT) मराठी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांची एनआयटीनं हकालपट्टी केली आहे. प्रथमेश शिंदे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे, प्रथमेश शिंदे (Prathamesh Shinde) यानं शेअर केलेला व्हिडीओ याआधीच जगभरात कोट्यवधी लोकांनी पाहिला आणि शेअर केला होता.

श्रीनगर एनआयटीमध्ये या विद्यार्थ्याविरोधात निदर्शनं करण्यात आली असल्याचीही माहिती मिळत आहे. या निदर्शनांनंतर काही विद्यार्थ्यांनी प्रथमेश शिंदेंविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर एनआयटीच्या शिस्तपालन समितीनं त्याची हकालपट्टी केली आहे. आता शिंदेच्या समर्थनार्थ आणि विरोधात सोशल मीडियात जोरदार प्रचार सुरू आहे. प्रथमेशवर गुन्हा दाखल झाल्यावर आता त्याच्या समर्थनार्थ हिंदू विद्यार्थ्यांनीही घोषणाबाजी करत एनआयटीत मोर्चा काढला आहे. 

वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टद्वारे भावना दुखावल्याचा ठपका 

जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) च्या विद्यार्थ्याविरुद्ध त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टवरुन गुन्हा दाखल केला. सोशल मीडिया पोस्टद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रथमेश शिंदे नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, एनआयटी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी एनआयटी श्रीनगरच्या एका विद्यार्थ्याने एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावनांविरोधातील संवेदनशील मजकूर अपलोड केल्याच्या प्रकरणाची दखल घेतली आहे. 

या संदर्भात निगेन पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 295A, 153A, 153 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रथमेश शिंदे नावाच्या एनआयटीच्या विद्यार्थ्यानं एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या प्रत्युत्तरात मंगळवारी संध्याकाळी एनआयटी श्रीनगरमध्ये निदर्शनं सुरू झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. 

NIT मधून प्रथमेश शिंदेचं निलंबन 

आयजीपी काश्मीर व्हीके बिरदी म्हणाले की, एनआयटी श्रीनगरच्या विद्यार्थ्यांनी वेगळ्या धर्माच्या सहकाऱ्यानं अपमानास्पद धार्मिक टिप्पणी केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एनआयटीच्या शिस्तपालन समितीनंही विद्यार्थ्याची संस्थेतून हकालपट्टी केली आहे. एनआयटीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, प्रथमेश शिंदे या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आलं असून यापुढे तो एनआयटीच्या कोणत्याही परीक्षेला बसू शकणार नाही. एवढंच नाहीतर यापुढे प्रथमेश शिंदे एनआयटीच्या हॉस्टेलमध्येही राहू शकणार नाही. त्याला हॉस्टेल तात्काळ रिकामं करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रथमेश शिंदेनं प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरुन सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Indian Migrants In America : मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
Success Story : खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manipur CM Biren Singh : एन.बिरेन सिंह यांचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजीनामा, कारण काय?Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh | बोर्डाची परीक्षा, घरात दु:खाचं वातावरण, वैभवी देशमुख म्हणाली..ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 09 February 2025Samant Brother On Rajan Salvi : राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार, मात्र साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Indian Migrants In America : मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
Success Story : खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; तब्बल 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
Rohit Sharma on Harshit Rana : '....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
'....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
Bhagwant Mann : दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
Eknath Shinde Birthday : एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
Embed widget